Union Budget 2023 : 5 साड्या आणि 5 विशेष अर्थसंकल्प, निर्मला सीतारमन यांचा खास पेहराव

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना हटके लूक केला होता. त्यांच्या साडीनं सर्वांचंच लक्ष वेधलं. 2023-24 चा अर्थसंकल्प लाल रंगाच्या संबलपुरी सिल्क साडीत सादर केला, ज्याला टेम्पल साडी देखील म्हटलं जातं.

2022 चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी कॉफी कलरची साडी नेसली होती. ज्यावर सोनेरी रेषा होत्या. या साडीला बोमकाई किंवा सोनपुरी साडी असंही म्हणतात.

2021 मध्ये निर्मला सीतारामन यांनी बंगालची प्रसिद्ध पोचमपल्ली साडी नेसली होती. ही साडी ऑफ व्हाईट रंगाची होती आणि त्या साडीला लाल प्रिंटेड बॉर्डर होती.

2020 मध्ये अर्थमंत्र्यांची साडी चांगलीच चर्चेत होती. त्यांनी पिवळ्या रंगाची कांजीवरम सिल्क साडी नेसली होती. त्यां साडीला सोनेरी काठ होते.
