ट्रक प्रवासानंतर आता राहुल गांधीनी शिकली बाईक रिपेअरिंग

कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी दिल्लीतील कोरलबाग येथील एका गॅरेजमध्ये मेकॅनिक्ससोबत काम केले. त्यांनी मंगळवारी रात्री याबद्दल आपल्या फेसबुक अकाऊंटवर फोटो शेअर करत माहिती दिली.

यामध्ये राहुल यांच्या हातामध्ये दुचाकीचा भाग दिसत आहे. त्यांच्या समोर एक दुचाकी ओपन करून ठेवलेली आहे.

गॅरेजमध्ये मेकॅनिक्स आणि काही लोक राहुल यांच्यासोबत दिसत आहेत. ते त्या कामगाराकडून मशीनची माहिती घेत आहेत.

तर एका फोटोमध्ये राहुल स्क्रू ड्रायव्हरने दुचाकीचे स्क्रू फिट करताना दिसत आहेत.
