‘परिणती – बदल स्वतःसाठी’ ट्रेलर प्रदर्शित, PHOTO पाहिलेत का?

- मराठी सिनेविश्वातील दोन ताकदवान अभिनेत्री अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी यांना एकत्र पाहाण्याची उत्सुकता वाढली
- काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘परिणती’ – बदल स्वतःसाठी’ (Parinati Movie) या मराठी चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
- ट्रेलरमध्ये अमृता सुभाष (Amruta Subhash) एका डॉक्टरच्या भूमिकेत दिसत असून, ती आपल्या नवऱ्यासोबत आणि मुलासोबत एक सुखी कुटुंब जगत आहे.
- ही कथा आहे दोन विभिन्न पार्श्वभूमी असलेल्या (Entertainment News) स्त्रियांची. त्यांच्या अनपेक्षित भेटीची, वाढत चाललेल्या मैत्रीची आणि संघर्षातून सशक्तपणे उभ्या राहिलेल्या आयुष्याची.
- सोनाली कुलकर्णी, जी एका बार डान्सरची भूमिका साकारत आहे, ती अमृताला आधार देण्यासाठी पुढे येते.
- सोनालीचा सकारात्मक दृष्टिकोन आणि तिच्या स्वाभाविक सहानुभूतीमुळे, दोघींमध्ये एक हळुवार आणि घनिष्ट मैत्री निर्माण होत असल्याचे दिसतेय.