Apple Store India : उद्यापासून मुंबईत सुरु होणार देशातील पहिले स्टोअर, पहा ओपनिंगपूर्वीचे फोटो

भारतातील पहिले Apple Store उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे.

Apple कंपनीचे सीईओ टिम कुक या शानदार Apple Store चे उदघाटन करणार आहेत. आज अँपलकडून देशातील या पहिल्या-वहिल्या Apple स्टोअरची छायाचित्रे आज माहितीसाठी जारी केली आहेत.

या स्टोअरमध्ये 100 कर्मचारी काम करणार असून ते देशातील 20 भाषांमध्ये लोकांना मदत करतील.

कंपनीच्या म्हणण्यानुसार हे Apple Store 100% अक्षय ऊर्जेवर चालणार आहे. यासाठी कंपनीकडून मोठ्या प्रमाणात सोलर पॅनलचा वापर केला आहे.

Apple ने भारतात आपल्या सेवांची २५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमिताने कंपनीचे सीईओ टिम कुक म्हणाले की, भारतातील 25 वर्षे अद्भूत राहिली आहेत. भारतात सुंदर संस्कृती आणि अविश्वसनीय ऊर्जा आहे.
