कुस्तीपटूंना फरफटत नेले, जंतरमंतरवरून तंबू उखडले; पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या संसदेचे उद्घाटन केले. दुसरीकडे, जंतरमंतरवर ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन संपविले.
पोलिसांनी कुस्तीपटूंना संसद भवनाकडे जाण्यापासून रोखल्याने गोंधळ उडाला. पोलिसांनी कुस्तीपटूंना ओढत आपल्यासोबत नेले.
कुस्तीपटूंना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला होता. ठिकठिकाणी बॅरिकेडिंगही लावण्यात आले होते.
देशातील अनेक कुस्तीपटू 23 एप्रिलपासून जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूंसह सात महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ब्रिजभूषण शरण सिंग याच्या अटकेसाठी कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु होते.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी कुस्तीपटूंची 'महिला सन्मान महापंचायत' होणार होती.
जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या पैलवानांनी शांततेत मोर्चा काढणार असल्याचे सांगितले होते.
मोर्चा काढण्यासाठी कुस्तीपटूंनी पोलिसांचे बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला.
नवीन संसद भवनासमोर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतले
विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह सर्व कुस्तीपटूंना ताब्यात घेण्यात आले.
पोलीस आणि कुस्तीपटूंच्या समर्थकांमध्ये गोंधळ झाल्याचे चित्रही समोर आले.
