भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर येथे मा.राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार संजय बनसोडे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी, कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख,मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव उपस्थित आहेत.
यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्रिशरण बुद्धवंदना म्हणण्यात आली. तसेच मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेचा उपयोग तळागाळातील लोकांना सशक्त करण्यासाठी केला. त्यांनी केवळ भारतातच नाही तर जगभरातील हक्कांना मानवी प्रतिष्ठेला वैचारिक संघटनात्मक बळ मिळवून दिलं आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.