Jacinda Ardern Resignation : 37 व्या वर्षी पंतप्रधानपदी, जगातील सर्वोत्तम नेता ते राजीनामा, जसिंडा अर्डर्न यांचा प्रवास

  • Written By: Published:
1 / 7

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा अर्डर्न (Jacinda Ardern) यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. राजीनाम्याची घोषणा करताना त्या म्हणाल्या की, त्या फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला राजीनामा देतील.

2 / 7

जसिंडा अर्डर्न यांचा जन्म 26 जुलै 1980 रोजी न्यूझीलंड मधील हॅमिल्टन येथे झाला. लहानपणापासून त्यांना राजकारणात रस होता. म्हणूनच त्यांनी 2001 मध्ये वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी न्यूझीलंडच्या लेबर पार्टीमध्ये प्रवेश केला.

3 / 7

2017 मध्ये वयाच्या 37 व्या वर्षी त्या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान झाल्या.

4 / 7

कोविड-19 आणि ओमिक्रॉन संकटात त्यांनी 2022 मध्ये स्वतःचे लग्न रद्द केले होते. जसिंडा अर्डर्न 2021 मध्ये टीव्ही होस्ट क्लार्क गेफोर्डशी लग्न करणार होत्या, पण कोविडमुळे त्यांनी ते रद्द केले होते.

5 / 7

पंतप्रधान पदावर असताना जसिंडा अर्डर्न आई बनल्या होत्या. पदावर असताना आई बनलेल्या त्या जगातील दुसऱ्या महिला आहे. पहिल्या महिला पाकिस्तानच्या बेनझीर भुट्टो होत्या, ज्या 1990 मध्ये पदावर असताना आई झाल्या होत्या. तेव्हा त्यांचे वयही ३७ वर्षे होते. 2017 मध्ये जेसिंडा प्रचार करत असताना ती गर्भवती होती. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या 8 महिन्यांतच त्या आई झाल्या.

6 / 7

2018 मध्ये तीन महिन्यांच्या मुलीसह संयुक्त राष्ट्रांच्या असेंब्ली हॉलमध्ये पोहोचली. अर्डर्न यांनी 21 जून 2018 रोजी मुलगी नीवला जन्म दिला आणि सप्टेंबरमध्ये ती तिच्यासोबत 73 व्या संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) गेल्या होत्या.

7 / 7

मे 2021 मध्ये फॉर्च्यून मासिकाने जसिंडा अर्डर्न यांना जगातील महान नेत्यांच्या यादीत पहिले स्थान दिले होते. व्हाईट आयलंडमधील ज्वालामुखीचा उद्रेक, कोरोना महामारीचा प्रसार रोखण्याच्या कामासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube