Nargis Fakhri ग्रीस ट्रीपच्या फोटोंमुळे चर्चेत; सोशल मिडीयावर शेअर केले खास फोटो

प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) हिने अल्पावधीत कलाविश्वात तिचं स्थान निर्माण केलं आहे.

‘रॉकस्टार’ (Rockstar Movie) या सिनेमातून नर्गिसने कलाविश्वात पदार्पण केलं. बऱ्याचदा ही अभिनेत्री तिच्या अभिनयापेक्षा स्टाइल आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येते.

यावेळी ती तिच्या ग्रीस ट्रीपच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. नर्गिसने सोशल मिडीयावर आपले ग्रीस ट्रीपचे खास फोटो शेअर केले आहेत.

नुकताच नर्गिस आणि रणबीर कपूरचा 2011 मध्ये प्रदर्शित झालेला माझा चित्रपट तब्बल 12 वर्षांनंतर पुन्हा थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.
