क्रिकेटच्या मैदानावरही नितीन गडकरींची तुफान फटकेबाजी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या सडेतोड बोलण्यामुळे कायम चर्चेत असतात. वेगवेगळ्या कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे ते सतत माध्यमांमध्ये येतात.

सध्या सोशल मीडियावर नितीन गडकरी यांनी क्रिकेटच्या मैदानावर केलेल्या तुफान फटकेबाजीही चर्चा सुरु आहे.

नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूरमध्ये खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे.

त्यावेळी नितीन गडकरी यांनी नागपूर छत्रपती नगर क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट सामनास्थळी भेट दिली.

त्यावेळी त्यांनी खेळाडूंसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला व खेळाडूंचा उत्साह वाढवला.
