पंकजा मुंडे गुवाहाटीत; सहकुटुंब घेतलं कामाख्या देवीच दर्शन पाहा फोटो…

- भाजपने नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतच गुवाहाटी, त्रिपुरा आणि कोलकाता येथे देवीच्या मंदिरांना भेटी देत दर्शन घेतलं.
- यावेळी त्यांच्यासोबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ देखील उपस्थित होत्या.
- यामध्ये त्यांनी गुवाहाटीमध्ये कामाख्या देवीचे दर्शन घेतलं. कोलकाता येथे दक्षिणेश्वर काली मातेचे दर्शन घेतलं. त्याचबरोबर त्रिपुरामध्ये त्रिपुरा सुंदरी या देवीचे दर्शन घेतल्याचा त्यांनी सांगितलं.
- या सर्व राज्यांमधील देवदर्शनाच्या वेळी पंकजा मुंडे यांच्या सह त्यांचे कुटुंब देखील उपस्थित होते.
- दरम्यान गुवाहाटीतील हे कामाख्या देवीचे मंदिर एकनाथ शिंदेंनी बंड केले त्यावेळी विशेष गाजलं. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक नेते कामाख्या देवीचे दर्शन घेत असतात.
- या सर्व देवींचे दर्शन घेतल्यानंतर मुंडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया साईटवर हे सर्व फोटो शेअर केले आहेत
- दरम्यान सध्या राज्यात सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यात कोल्डवॉर सुरू आहे.
- ते दोघेही एकमेकांवर टीका आणि आरोप करण्याची एकही संधी सोडत नाही.
- नुकतचं पंकजांनी बीडमध्ये पाटोदा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा प्रसंगी भेट दिली त्यावेळी त्यांनी टीकाकारांना उत्तर दिले.