अहिल्यादेवींच्या चौंडीत राजकियांची मांदियाळी; पाहा मंत्र्यांचे काठी अन् घोंगडं घेतलेले खास फोटो

- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 वी जयंतीनिमित्त राज्य मंत्रिमंडाळाची बैठक चौंडी येथे आयोजित करण्यात आली होती.
- विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांना निमंत्रित केले होते.
- अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनावर चित्रपट काढला जाणार आहे.चौंडीचा तिर्थस्थळ म्हणून विकास केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
- यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सभापती राम शिंदे यांच्या हस्ते पुजा संपन्न झाली.
- या बैठकीची खासियत म्हणजे यावेळी आलेल्या सर्व पाहुण्यांना पिवळा फेटा, काळी घोंगडी अन् हातात काठी देण्यात आली होती.
- या बैठकीसाठी जिल्हा प्रशासनाने खास मेन्यू ठेवला होता. जेवणासाठी कर्जतची प्रसिद्ध शिपी आमटी, पुरणपोळी, शेंगोळे, मासवडी, हुरडा थालीपीठ असा झणझणीत बेत आहे. या जेवणाचा सगळा खर्च विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे उचलला आहे.