Swara Bhaskar च्या रिसेप्शनमध्ये राजकीय नेत्यांची मांदीयाळी

मुंबई : स्वरा भास्कर आणि फहद अहमद यांनी फेब्रुवारीमध्ये कोर्ट मॅरिज केले. आता त्यांनी मित्र आणि नातेवाईकांसाठी रिसेप्शन ठेवले होते.

स्वरा भास्कर आणि फहद अहमदने दिल्लीमध्ये रिसेप्शनचं आयोजन केलं होत. या रिसेप्शनमध्ये राजकीय नेत्यांची मांदीयाळी पाहायला मिळाली.

या रिसेप्शनमध्ये कॉंग्रेस नेते राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, शशि थरूर आणि जया बच्चनसह अनेक राजकीय नेते होते.

यावेळी केजरीवाल ट्राउजर आणि त्यांचा सिग्नेचर चेक्ड शर्ट मध्ये दिसले. तर शशि थरूर यांनी गोल्डन यलो सिल्क कुर्ता घातला होता.

खासदार सुप्रिया सुळेंनीही या रिसेप्शनला हजेरी लावली. त्यावर त्यांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत सुभेच्छा दिल्या आहेत.

या रिसेप्शन पार्टीसाठी स्वराने पिंक लहंगा आणिन फहदने गोल्डन शेरवानी घातली होती.
