MItali Raj : रिलेशनशिपमध्ये राहिली, लग्नाला नकार दिला, जाणून घ्या ‘या’ महिला क्रिकेटरने अविवाहित राहण्याचा निर्णय का घेतला?

  • Written By: Published:
1 / 7

भारतीय महिला क्रिकेटची माजी कर्णधार मिताली राज हिला महिला क्रिकेटचा 'सचिन तेंडुलकर' म्हटले जाते. अनेक विक्रमांमध्ये ती पुरुष क्रिकेटपटूंच्या पुढे आहे.

2 / 7

भारताची माजी क्रिकेटपटू मिताली राज ही देशातील आणि जगातील सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक आहे. वनडेमध्ये सर्वाधिक 7805 धावा करण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. मितालीच्या या विक्रमाच्या आसपास सध्या एकही महिला क्रिकेटर नाही.

3 / 7

मिताली राज 40 वर्षांची आहे. तिने लग्न केलेले नाही. लग्न न करण्याचा तीचा स्वतःचा निर्णय आहे. 2018 मध्ये तिने मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत लग्न न करण्याबाबत चर्चा केली होती. तेव्हा ती म्हणाली होताी की मी अविवाहित राहून आनंदी आहे. म्हणूनच लग्न करायचे नाही.

4 / 7

मुलाखतीदरम्यान मिताली राज म्हणाली, 'मी लहान असताना लग्नाची गोष्ट फार पूर्वीच माझ्या मनातून काढून टाकली होती. जेव्हा मी विवाहित लोकांना पाहते तेव्हा मला वाटते की अविवाहित राहणे चांगले आहे.

5 / 7

त्याचवेळी स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या मुलाखतीत मिताली राजने खुलासा केला की, ती पूर्वी रिलेशनशिपमध्ये होती. दरम्यान, तिचे लग्न झाले असते तरी क्रिकेट खेळणे सुरूच ठेवले असते, असे तिने सांगितले होते.

6 / 7

मिताली राज ही एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे जिने वयाच्या 20 वर्षापूर्वी एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात शतक झळकावले. एकदिवसीय सामन्यांमध्ये तिने 64 अर्धशतके आहेत. कोणत्याही महिला फलंदाजाने इतकी अर्धशतके झळकावली नाहीत.

7 / 7

8 जून 2022 रोजी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या मिताली राजने भारतासाठी 12 कसोटी, 232 एकदिवसीय आणि 89 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यादरम्यान तिने कसोटीत 699 धावा, एकदिवसीय सामन्यात 7805 धावा आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 2364 धावा केल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube