Photos : स्वानंदी-आशिषच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल; चाहते, सेलिब्रेटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री स्वानंदी टीकेकर आणि इंडियन आयडल फेम गायक आशिष कुलकर्णीचा साखरपुडा पार पडला.

त्यानंतर आता त्यांच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल होतं आहेत. तसेच त्यांच्यावर चाहत्यांसह सेलिब्रेटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दोन तीन दिवसांपूर्वीच स्वानंदी टीकेकरने एक पोस्ट करत आपल्या साखरपुड्याची माहिती दिली होती. त्यावर चाहत्यांना सुखद धक्का बसला होता.

आमचं ठरलं असं म्हणत स्वानंदीने आपल्या हातावरील मेहंदीचा फोटो शेअर करत ही माहिती दिली होती.

दरम्यान साखरपुड्याचे फोटो शेअर करताना स्वानंदीने लिहीले की, अखेर आम्ही एंगेज झालो आहोत.
