Swara Bhaskar : स्वरा घेतीय मातृत्वाचा आनंद, पाहा फोटो
नुकतीच स्वरा भास्कर एका बाळाची आई झाली आहे. 23 सप्टेंबर रोजी तिने मुलीला जन्म दिला.
सध्या स्वरा तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. तिने सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये स्वरा पुस्तक वाचताना आणि आराम करताना दिसत आहे.
यावेळी स्वराने ग्रे कलरचा टी-शर्ट आणि व्हाईट पँट परिधान केली आहे.
स्वरा भास्करने यावर्षी 6 जानेवारीला फहाद अहमदसोबत लग्न केले. 6 जून रोजी तिने प्रेग्नेंसीची घोषणा केली.
