IND vs NZ T20I : न्यूझीलंड विरुद्ध T20 मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हिटमॅनच्या नावावर

भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत 23 T20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यामध्ये रोहित शर्माने 17 सामने खेळले असून त्यात त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत.


कॉलिन मुनरो हा भारत-न्यूझीलंड T20 सामन्यात सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. मुनरोने 38.72 च्या सरासरी आणि 148.95 स्ट्राइक रेटने भारताविरुद्ध 12 सामन्यात 426 धावा केल्या आहेत.

या यादीत केन विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. विल्यमसनने भारताविरुद्धच्या 13 टी-20 सामन्यांमध्ये 34.91 च्या सरासरीने आणि 130.12 च्या स्ट्राइक रेटने 419 धावा केल्या आहेत.

मार्टिन गप्टिल चौथ्या क्रमांकावर आहे. गप्टिलने भारताविरुद्ध 16 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये गुप्टिलने 23.75 च्या सरासरीने आणि 131.03 च्या स्ट्राईक रेटने 380 धावा केल्या आहेत.
