गेल्या हंगामात फ्लॉप झालेले हे दिग्गज आयपीएल 2023 मध्ये ऑरेंज कॅपचे प्रबळ दावेदार

IPL 2023 मध्ये ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. कोहली सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या मोसमात त्याने 22.73 च्या सरासरीने 341 धावा केल्या होत्या.

या यादीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याची कामगिरी अत्यंत खराब होती, त्याने फक्त 19.14 च्या सरासरीने 268 धावा केल्या.

केकेआरकडून खेळणारा व्यंकटेश अय्यर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवताना दिसत आहे. अय्यरने IPL 2022 च्या 12 सामन्यांमध्ये फक्त 16.55 च्या सरासरीने 182 धावा केल्या. अय्यर हा स्फोटक फलंदाज आहे, तो 2023 मध्ये ऑरेंज कॅप जिंकू शकतो.

भारतीय खेळाडू मनीष पांडे आयपीएल 2023 मध्ये ऑरेंज कॅप जिंकू शकतो. 2022 मध्ये, लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना त्याने 6 सामन्यात केवळ 14.67 च्या सरासरीने 88 धावा केल्या. आयपीएल 2023 साठी त्याला दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले आहे.
