Republic Day 2023 : राजपथावर राज्याचा साडेतीन शक्तिपीठाचा देखावा, चित्ररथाची पहिली झलक समोर

प्रजासत्ताक दिन काही दिवसावर आला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत दरवर्षी प्रमाणे होणाऱ्या संचलनाची तयारी सुरु झाली आहे. कर्तव्यपथावरील संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथही असणार.

यावर्षीचा राज्याचा चित्ररथ 'साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर' यावर साकारण्यात आलाय.

कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तीपीठांचा देखावा असणार आहे. रथासमोर देवीचे गोंधळी आणि चित्ररथावर पोतराज असणार आहेत.
