… म्हणून साजरा करतात International Tiger Day जाणून घ्या महत्त्व

International Tiger Day 2023 : वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक यंत्रणेला चालना देण्यासाठी तसेच निसर्गामध्ये विविधता आणि संपन्नता कायम राहते त्यासाठी हा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो.

अन्नसाखळीमध्ये वाघाचे स्थान सर्वात वरचे असते. त्यामुळे इतर प्राण्यांच्या संख्येमध्ये समतोल राहतो. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे जंगलांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे वाघांची संख्या कमी होत आहे. तसेच शिकार, तस्करी हे कारण यामध्ये आहेत.

त्यामुळे 29 जुलै हा दिवस वाघांच्या अस्तित्वाबाबात जागरीकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. रशियातील सेंट पीटर्सबर्गमध्ये 2010 साली व्याघ्र संवर्धनाच्या शिखर परिषदेत ही घोषणा करण्यात आली.
