शिवजयंती निमित्त विकी कौशल रायगडावर, छावाला पाहण्यासाठी चाहत्यांची अलोट गर्दी…

- विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत आहे.
- या दरम्यान आजच्या शिवजयंतीनिमित्त छावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलेला अभिनेता विकी कौशलने रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांना अभिवादन केलं.
- रायगडाला दिलेल्या भेटीचे फोटो त्याने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
- या फोटोंना कॅप्शन देताना व्यक्तीने म्हटले की, माझं भाग्य आहे की, मला शिवजयंतीनिमित्त रायगडावर जाऊन महाराजांना अभिवादन करता आलं.
- पुढे तो म्हणाला, इथं येण्याची माझी पहिली वेळ होती. तसेच शिवजयंतीनिमित्त रायगडावर येणं महाराजांचे आशीर्वाद मिळवण्याची ही एक अत्यंत खास संधी आहे. असेही तो म्हणाला.
- तसेच यावेळी विकी कौशलने सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देखील दिल्या.
- दरम्यान छावा चित्रपटाची सध्या सुरू असलेली विक्रमी घोडदौड पाहता चहात्यांनी विकीला पाहण्यासाठी तोबा गर्दी केली तर पाहायला मिळालं.
- त्यावेळी रायगडावर महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी विकी कौशलला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देत सत्कार केला.
- छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिक चित्रपटाने प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित केले असून, थिएटरमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.