ब्रेकिंग : होर्मुझची सामुद्रधुनी संपूर्ण जगासाठी खुली करतोय; ट्रम्प यांची मोठी घोषणा

Iran War ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नाकेबंदी जाहीर केली होती, ज्यामुळे जागतिक ऊर्जा सुरक्षेला धोका निर्माण झाला होता.

  • Written By: Published:
ब्रेकिंग : होर्मुझची सामुद्रधुनी संपूर्ण जगासाठी खुली करतोय; ट्रम्प यांनी मोठी घोषणा

I Am Permanently Opening The Strait Of Hormuz Says Us President Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत एक मोठे विधान करत घोषणा केली आहे. केवळ ४८ तासात, अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझवरील नाकेबंदी संपल्याची घोषणा केली. एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले, “होर्मुझ आता सर्वांसाठी खुला आहे. मला ही घोषणा करताना आनंद होत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेने सोमवारी (दि. 13) होर्मुझवर नाकेबंदी जाहीर केली होती. 

ट्रम्प यांची पोस्ट काय?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझवरील नाकेबंदी संपुष्टात आणल्याची घोषणा केली आहे. याबाबत केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी “मी चीन आणि जगासाठी होर्मुझची सामुद्रधुनी कायमची खुली करत आहे.” हे चीन आणि संपूर्ण जगासाठी करत आहे. अशी परिस्थिती पुन्हा कधीही निर्माण होणार नाही. चीनने इराणला शस्त्रे न पाठवण्यास सहमती दर्शवली आहे. जेव्हा मी काही आठवड्यांत तिथे पोहोचेन, तेव्हा अध्यक्ष शी जिनपिंग माझे मिठी मारून स्वागत करतील. आम्ही एकत्र मिळून खूप हुशारीने आणि चांगल्या प्रकारे काम करत आहोत असे ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ट्रम्प यांनी का खुली केली होर्मुझ सामुद्रधुनी?

1. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, होर्मुझबाहेरील अमेरिकेची नाकेबंदी अयशस्वी ठरली आहे. नाकेबंदीच्या पहिल्या दिवशी, अंदाजे २० जहाजे होर्मुझमधून गेली. अमेरिकन सैन्य या जहाजांना थांबवू शकले नाही. यातील बहुतेक जहाजे चिनी होती आणि चीनने अमेरिकेला कडक इशारा दिला होता. त्यामुळे या जहाजांना थांबवणे अमेरिकेसाठी महागात पडू शकले असते.

2. ब्रिटन आणि फ्रान्ससारखे देश होर्मुझच्या मुद्द्यावर सक्रिय होते. युद्धात सामील असलेल्या कोणत्याही देशाला होर्मुझमधून हटवले जावे, असा फ्रान्सचा आग्रह होता. एक युद्धखोर राष्ट्र संपूर्ण जगाला धमकावू शकत नाही. ब्रिटन आणि फ्रान्स या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी एक व्यापक आघाडी तयार करत होते.

3. शांतता करारावर चर्चा करण्यासाठी या आठवड्याच्या अखेरीस इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात एक बैठक नियोजित आहे. या बैठकीपूर्वी होर्मुझ संघर्षात झालेली नामुष्की वाटाघाटींच्या टेबलावर ट्रम्प यांच्या गटाला कमकुवत करू शकते. चर्चा सुरू होण्यापूर्वीच ट्रम्प यांनी स्वतःला त्यापासून दूर केले आहे.

follow us