अमेरिकेत नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघात, भरधाव ट्रकने 10 जणांना चिरडलं

  • Written By: Published:
Letsupp Image (9)

दक्षिण अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स शहरात भरधाव वेगाने आलेल्या ट्रक गर्दीत घुसल्याने भीषण अपघात झाल्याचे वृ्त्त समोर आले आहे. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून, 30 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर चालक ट्रकमधून बाहेर आला आणि त्याने गोळीबार सुरू केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

रिपोर्टनुसार, लुईझियाना शहरातील लोकप्रिय पर्यटन स्थळ फ्रेंच क्वार्टरमधील बोर्बन स्ट्रीटवर नववर्षाच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी जमली होती. यादरम्यान भरधाव ट्रक उपस्थित गर्दीत घूसला यात 30 नागरिक जखमी झाले असून, 10 जणांचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडिया पोस्ट्सवरून हा अपघात अतिशय भीषण असल्याचे समोर आले आहे. अपघातानंतरचे अनेक व्हिडिओ फुटेज आणि छायाचित्रेही समोर आली आहेत. यामध्ये चौकाचौकात पोलिसांची वाहने आणि रुग्णवाहिका उभ्या असल्याचे दिसून आले. पोलिसांनी लोकांना सध्या या भागात जाणे टाळण्यास सांगितले आहे. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रकमधून बाहेर आला आणि त्याने गोळीबार सुरू केल्याचेही काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

follow us