Video : मोठी बातमी! फुटबॉल सामन्यात चेंगराचेंगरी, 56 जणांचा मृत्यू
Guinea Football Match : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार गिनीमध्ये (Guinea) फुटबॉल सामन्यादरम्यान (Football Match) झालेल्या चेंगराचेंगरीत 56 जणांचा मृत्यू झाला आहे. सामना सुरु असताना चाहत्यांमध्ये हाणामारी झाली आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 56 जणांचा मृत्यू झाला.
माहितीनुसार, दक्षिण गिनी येथील फुटबॉल स्टेडियममध्ये चाहत्यांमध्ये हाणामारी झाली आणि त्यानंतर चेंगराचेंगरीत 56 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले असल्याची माहिती गिनी सरकारने दिली आहे. तसेच आरोपींविरोधात कारवाई होणार असल्याची माहिती मंत्री फाना सौमाह (Fana Soumah) यांनी दिली.
स्थानिक मीडियानुसार, दक्षिण गिनी येथील न्झेरेकोर शहरातील स्टेडियममध्ये लाबे आणि एनगेरेकोर संघामध्ये स्थानिक स्पर्धेचा अंतिम सामना सुरु होता आणि या सामन्यात चाहत्यांमध्ये हाणामारी झाल्याने ही दुर्घटना घडली. तर दुसरीकडे रुग्णालयात मोठ्या संख्येने मृतदेह पडले आहे. कॉरिडॉरमध्ये लोक जमिनीवर पडलेले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अनेक मुले आहेत तर काही जखमींवर प्रादेशिक रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरने दिली आहे.
🇬🇳⚡- Around 100 people were killed yesterday evening at a soccer match in the town of Nazar Gura, Guinea, near the border with Liberia, after violent fights broke out. pic.twitter.com/rnwBqgdAeZ
— Mohammad Javid (@PhyuLay60937915) December 2, 2024
परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराचा वापर करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामुळे समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी दगडफेक केली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्टेडियमच्या एका भागात चाहते ओरडत आहेत आणि रेफरिंगचा निषेध करत आहेत.
कारवाई होणार, पराभवानंतर काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये, ‘या’ नेत्यांची वाढणार डोकेदुखी
तर काहीजण स्टेडियममधून पळून जात असल्याचे देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच व्हिडिओमध्ये अनेक लोक हॉस्पिटलमध्ये जमिनीवर पडलेले आणि जवळपास जमाव जमलेला दिसत आहे, काही जण जखमींना मदत करत आहेत.