कारवाई होणार, पराभवानंतर काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये, ‘या’ नेत्यांची वाढणार डोकेदुखी
Maharashtra Congress : विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला (MVA) धक्का देत महायुती (Mahayuti) राज्यात दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. सरकारचा 5 डिसेंबर रोजी शपथविधी देखील होणार आहे. तर दुसरीकडे आता विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे काँग्रेस (Congress) ॲक्शन मोडमध्ये आली आहे. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करणार आहे.
माहितीनुसार, आतापर्यंत काँग्रेस काही नेत्यांना नोटीस देखील पाठवली आहे तर पुढील काही दिवसात आणखी काही नेत्यांना नोटिसा पाठवले जाणार आहे. माहितीनुसार दिल्लीतील काँग्रेस नेते महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर नाराज असून पक्षाविरोधात कारवाया करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस (Maharashtra Congress) कधी आणि किती नेत्यांवर कारवाई करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागुना आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने अशा स्थानिक नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवल्या आहेत ज्यांच्या विरोधात निवडणुकीमध्ये पक्षा विरोधात काम करण्याच्या तक्रारी आल्या आहे. राज्यातील 20 पेक्षा जास्त ठिकाणांहून पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विरोधात काम केल्याच्या तक्रारी काँग्रेसकडे आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन संबंधितांना नोटिसा पाठवल्या जाणार आहे. काँग्रेसकडून आतापर्यंत नागपूर मध्य विधानसभा काँग्रेस उमेदवार बंटी शेळके (Bunty Shelke) यांच्यासह सूरज ठाकूर आणि इतर काहीजणांना नोटिसा पाठवण्यात आले आहे. तसेच जर या नोटिशींना उत्तर त्यांनी दिले नाहीत, तर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देखील काँग्रेसकडून देण्यात आला आहे.
तर दुसरीकडे राज्यात 05 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी होणार आहे. सध्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये गृह खात्यावरून जोरदार रस्सी खेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे गृह विभाग कोणाकडे जाणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
EVM विरोधात काँग्रेसनंतर वंचित बहुजन आघाडीही मैदानात, उभारणार जनआंदोलन
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फक्त 48 जागांवर यश मिळाला आहे. त्यामध्ये शिवसेना ठाकरे गट 20, काँग्रेस 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागांवर विजय मिळाला आहे तर 2 जागांवर समाजवादी पक्षाला यश आले आहे. तर महायुतीमध्ये भाजपला 131, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 41 जागांवर विजय मिळाला आहे.