वर्षभरात मोडला मिया खलिफाचा दुसरा संसार

वर्षभरात मोडला मिया खलिफाचा दुसरा संसार

Adult Film Star Mia Khalifa Divorce: एडल्ट फिल्म स्टार मिया खलिफाने लग्नाच्या अवघ्या वर्षभरानंतर पती रॉबर्ट सँडबर्गला घटस्फोट दिला आहे. खुद्द मियाने आपण पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मियाने 21 जुलै 2021 रोजी पती रॉबर्ट सँडबर्गसोबत लग्नाची घोषणा केली आणि आता ती वेगळी होत आहे. त्यांनी विभक्त होण्याचे कारण ‘आपसी मतभेद’ असल्याचे सांगितले होते.

दरम्यान मिया आणि रॉबर्ट यांनी 2020 मध्ये लग्न केले होते. अलीकडेच त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस देखील त्यांनी साजरा केला. मात्र त्यानंतर नुकतेच मियाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने दोघांचे फोटो टाकून घटस्फोटाची घोषणा केली.

‘गुड गव्हर्नन्स’ ! पत्राच्या माध्यमातून शेट्टींनी टोचले मुख्यमंत्र्यांचे कान

पतीसोबत विभक्त झाल्याची घोषणा करताना मिया खलिफाने लिहिले की, आमचे लग्न यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व काही केले पण जवळपास वर्षभर प्रयत्न केल्यानंतर आम्ही दूर जात आहोत. आम्ही चांगले मित्र आहोत आणि आम्ही खरोखरच लग्न वाचवण्याचा प्रयत्न केला. आम्ही नेहमीच एकमेकांवर प्रेम आणि आदर करू कारण आम्हाला माहित आहे की आमच्या विभक्त होण्यामागील कारण म्हणजे असंतुलित मतभेद आहेत ज्यासाठी कोणीही एकमेकांना दोष देऊ शकत नाही.

गौतमीवर अजितदादा म्हणाले…सगळ्यांना पाहता येईल असं काम करावे

मियाचा दुसरा घटस्फोट
मियाने 2011 मध्ये तिच्या हायस्कूल प्रियकराशी पहिले लग्न केले आणि 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तिचा दुसरा पती सँडबर्गने तिला मार्च 2020 मध्ये प्रपोज केले होते. नंतर दोघांनी 2021 मध्ये लग्न केले. रॉबर्ट, 28, हा व्यवसायाने एक आचारी आहे आणि लॉस एंजेलिसमध्ये मियासोबत राहत होता. आता मिया तिच्या दुसऱ्या लग्नातूनही घटस्फोट घेत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube