Ind Vs Pak : पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान अणुयुद्धाच्या तोंडावर होता, अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांचा दावा
नवी दिल्ली : फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोट सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तान भारतावर अणूहल्ल्याच्या तयारीत होता, अशी माहिती तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पीओ यांनी दिली होती, असा दावा पॉम्पीओ यांनी आपल्या एका पुस्तकात केला आहे. पॉम्पीओ यांच्या म्हणण्यानुसार सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या की हे त्यावेळी भारत देखील आक्रमक प्रत्युत्तराची तयारी करत आहे.
दोन दिवसापूर्वी प्रकाशित झालेल्या पॉम्पीओ यांच्या ‘नेव्हर गिव्ह एन इंच: फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह’ या नवीन पुस्तकात पॉम्पीओ यांनी घटनांचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहले आहे की ते 27-28 फेब्रुवारीच्या दौऱ्यावर असताना हा प्रसंग घडला. ते अमेरिका-उत्तर कोरिया शिखर परिषदेसाठी हनोई येथे होते. पण त्याच दिवशी त्यांच्या टीमने हे संकट टळण्यासाठी भारत आणि पाकिस्तानसोबत रात्रभर बोलणी केली. याच पुस्तकात त्यांनी असंही म्हटलं आहे की, “भारत-पाकिस्तान फेब्रुवारी 2019 मध्ये अणुहल्ल्यापर्यंत आला होता, हे जगाला माहीत आहे असे मला वाटत नाही.”
पॉम्पीओ यांनी लिहलेल्या माहितीनुसार त्यांना खात्री होती की भारत आपली अण्वस्त्रे तैनात करण्याची तयारी करत आहे. त्यांनतर आम्हाला काही तास लागले आणि आमच्या नवी दिल्ली आणि इस्लामाबादमधील टीमने चांगले काम केले. प्रत्येक बाजू समजावून सांगितली शेवटी ते तयार झाली की अणूयुद्धाची तयारी करणार नाहीत.
पॉम्पीओ यांच्या या दाव्यांवर अजूनही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली गेली नाही पण पॉम्पीओ यांच्या एका आरोपावर एस. जयशंकर यांनी उत्तर दिले आहे.
सुषमा स्वराज महत्त्वाच्या नव्हत्या
याच पुस्तकात माईक पॉम्पीओ म्हणतात की त्यांनी सुषमा स्वराज यांना ‘महत्त्वपूर्ण राजकीय व्यक्ती’ म्हणून कधीही पाहिले नाही परंतु परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी त्यांच्या पहिल्या भेटीत त्यांनी चांगली मैत्री केली. पॉम्पीओ यांनी त्यांच्या पुस्तकात सुषमा स्वराज यांच्यासाठी अपशब्द वापरले आहेत.
सुषमा स्वराज मे 2014 ते मे 2019 पर्यंत परराष्ट्र मंत्री होत्या. ऑगस्ट 2019 मध्ये त्यांचे निधन झाले. पॉम्पीओ पुस्तकात लिहितात की सुषमा स्वराज यांच्या कार्यकाळात भारतीय परराष्ट्र धोरण टीममध्ये एकही महत्त्वाचा व्यक्ती नव्हता. त्याऐवजी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत अधिक जवळून काम केले. असं लिहलं आहे