खलिस्तान्यांना अमेरिकेचा कडक इशारा! संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या मागणीला अमेरिकेचा प्रतिसाद

America warn to Khalistani on Defense Minister Rajnath Singh demand : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय इंटेलिजन्स डायरेक्टर तुलसी गबार्ड यांची अनेक विषयांवर चर्चा झाली. ज्यामध्ये प्रामुख्याने संरक्षण आणि सूचना दिल्या गेल्या. ज्यामध्ये भारत आणि अमेरिकेतील सामरिक संबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं.
नागपूर का पेटलं? ‘कबरीचा वाद, पोलिसांवर दगडफेक’ काय-काय घडलं, वाचा सविस्तर…
यामध्ये भारताकडून अमेरिकेमध्ये खलिस्तानी संघटनांना मिळणारा आसरा आणि त्यांच्याकडून भारताविरुद्ध करण्यात येणाऱ्या कारवयांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर अमेरिकेकडून कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. तुलसी गबार्ड या भारताच्या अडीच दिवसांसाठीच्या दौऱ्यावर आल्या होत्या.
पतंगरावांनी केलेलं टीकवं म्हणजे झालं, जयंतरावांचा सल्ला घे; अजितदादांचा विश्वजित कदमांना टोला
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर भारतामध्ये येणाऱ्या त्या पहिल्या अमेरिकन उच्च अधिकारी होत्या या भेटीमध्ये त्यांनी भारत अमेरिका संबंधांवर जोर दिला. त्यावेळी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांच्याशी चर्चा केली. यामध्ये कॅनडाच्या गुप्तहेर संघटनेचे प्रमुख डॅनियल रोजर्स आणि ब्रिटनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोनाथन पॉवेल यांचा देखील या संमेलनामध्ये सहभाग होता. दरम्यान या संमेलनामध्ये झालेल्या अनेक चर्चासत्रांना सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या कारणास्तव गुप्त ठेवण्यात आला आहे.