आर्टिफिशियल इंटेलिजन्सने रचला इतिहास, एआय वकिलाने न्यायालयीन खटल्यात मानवी वकिलांविरोधात मिळवला विजय

ब्रिटनमध्ये प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित कायदेशीर प्रणालीने न्यायालयीन खटल्यात मानवी वकिलांविरोधात विजय मिळवला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 50

Artificial Intelligence makes history : आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थातच एआय आता केवळ फोटो तयार करणे, एखाद्या विषयावर लिहिणं किंवा प्रश्नांची उत्तरे देणे इतक्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. आता एआयने न्यायव्यवस्थेत देखील इतिहास रचल्याचा पाहायला मिळतंय. ब्रिटनमध्ये प्रथमच एआय आधारित कायदेशीर प्रणालीने न्यायालयीन खटल्यात मानवी वकिलांविरोधात विजय मिळवला आहे. त्यामुळे कायदा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात हा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे.

बृत्तांमध्ये गारफिल्ड एआय या एआय लॉ फार्मच्या चॅटबॉटने एका क्लायंटच्या वतीने न्यायालयीन खटल्याची संपूर्ण तयारी केली आणि अखेर विजय देखिव मिळवून दिला. हा खटला फ्रिलान्स एचआर एक्झिक्युटिव्ह टॅमिरेस कॅमेल टॅक्विडीर यांच्याशी संबंधित होता. त्यांनी थकीत मानधनाच्या वसुलीसाठी एका हॉस्पिटॅलिटी कंपनीच्या विरोधात स्मॉल क्लेम कोर्टमध्ये दावा दाखल केला होता. या प्रकरणासाठी त्यांनी गारफिल्ड एआयला अवघ्या 400 पाउंड म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये फक्त 50 हजार रुपयांची फी देऊन नियुक्त केले. पारंपरिक वकील नेमला असता त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च झाला असता.

गारफिल्ड एआय ने या खटल्यासाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर तयारी स्वतः केली. यामध्ये दाव्याची कागदपत्रे तयार करणे, चार साक्षीदारांचे जबाब संकलित करणे, पुरावे मांडणे आणि संपूर्ण कायदेशीर रणनीती तयार करणे यांचा समावेश होता. सुनावणी सुरू होण्यापूर्वी एआयने न्यायालयात प्रत्यक्ष युक्तिवाद करण्यासाठी वन एसेक्स कोर्ट येथील कनिष्ठ बॅरिस्टर डॉमिनिक ली यांची नियुक्ती केली.

मुंबईतील जे. जे. महानगर रक्तपेढी आणि माया ब्लड सेंटरवर एफडीएची कारवाई, दोन्ही रक्तपेढ्यांचे कामकाज तात्काळ बंद

वँड्सवर्थ काउंटी कोर्टमध्ये जवळपास तीन तास दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने गारफिल्ड एआयने तयार केलेल्या बाजूच्या समर्थनार्थ निकाल दिला. विरोधी पक्षाचा दावा फेटाळून लावत न्यायालयाने क्लायंटला सुमारे 7,000 पाउंड म्हणजेच जवळपास 8.8 लाख रुपयांच्या दाव्यातून दिलासा दिला. निकालानंतर बॅरिस्टर डॉमिनिक ली यांनी एआयने तयार केलेली कागदपत्रे अत्यंत सविस्तर आणि प्रभावी असल्याचे सांगितले.

गारफिल्ड AI चे सह-संस्थापक फिलिप यंग यांनी या विजयाला कायदा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण म्हटले आहे. त्यांच्या मते, एखाद्या एआय प्रणालीने मानवी सॉलिसिटर्सविरोधात न्यायालयीन खटला जिंकण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे.

गारफिल्ड एआयला एप्रिल 2025 मध्ये ब्रिटनच्या सॉलिसिटर्स रेग्युलेशन अथॉरिटीकडून अधिकृत मान्यता मिळाली होती. केवळ एआयच्या मदतीने कायदेशीर सेवा देण्यासाठी परवानगी मिळालेली ही जगातील पहिली लॉ फर्म मानली जाते. ही संस्था प्रामुख्याने 10 हजार पाउंडांपर्यंतच्या स्मॉल क्लेम्स म्हणजेच लहान आर्थिक दाव्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये कायदेशीर सेवा देते.

ब्रिटनमध्ये कायदेशीर सेवांमध्ये एआयचा वापर वेगाने वाढत असला तरी गारफिल्ड एआयचा हा विजय विशेष ठरला आहे. कारण प्रथमच एआयने तयार केलेली कायदेशीर रणनीती, पुरावे आणि कागदपत्रे न्यायालयात यशस्वी ठरली आहेत. त्यामुळे भविष्यात न्यायव्यवस्था, वकिली व्यवसाय आणि कायदेशीर सेवांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची भूमिका आणखी व्यापक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

follow us