मोठी बातमी! बांग्लादेशातील व्हिसा केंद्र अनिश्चित काळासाठी बंद; भारताचा मोठा निर्णय

मोठी बातमी! बांग्लादेशातील व्हिसा केंद्र अनिश्चित काळासाठी बंद; भारताचा मोठा निर्णय

Bangladesh Crisis : सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण व्यवस्थेच्या विरोधात बांगलादेशात (Bangladesh) गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या आंदोलनात आतापर्यंत 400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे. देशात सत्तापलट झाल्यानंतर अल्पसंख्यक हिंदू समाजाला टार्गेट केले जात आहे. या घटनांवर जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. या घडामोडीवर भारत सरकारची बारकाईने नजर आहे. यातच आता भारताने मोठा निर्णय घेतला आहे. भारताने बांग्लादेशात दूतावासाचे व्हिसा केंद्र अनिश्चित काळासाठी बंद केले आहे.

Bangladesh Protests : मोठी बातमी! बांग्लादेशात स्थापन होणार अंतरिम सरकार, गुरुवारी शपथविधी

भारतासाठी आता कठीण काळ सुरू झाला आहे. शेख हसीना यांनी सत्ता सोडल्याने आता बांग्लादेशात त्या सर्व गोष्टी होतील ज्या चीन आणि पाकिस्तानसाठी फायदेशीर ठरतील. देशातील कोणत्याही प्रकल्पात भारताचा प्रभाव राहणार नाही. त्यामुळे आगामी काळात व्यापारी, राजकीय आणि सामरिक या सगळ्या आघाड्यांवर भारताला अधिक सावध राहावे लागणार आहे. शेख हसीना यांच्या कार्यकाळात सन २००९ पासून दोन्ही देशांत ज्या सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत त्या सगळ्या थांबतील.

याची प्रचिती येण्यास सुरुवात झाली आहे. बांग्लादेशातील सध्याची परिस्थिती पाहता येथील व्हिसा केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच येथील दूतावासांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. भारतीय व्हिसा अर्ज केंद्राने (आयव्हीएसी) घोषणा केली आहे की बांग्लादेशातील अस्थिर स्थिती लक्षात घेता सर्व व्हिसा केंद्र अनिश्चित काळासाठी बंद राहतील. व्हिसासाठी अर्ज कधी करावा याची माहिती एसएमएसच्या माध्यमातून देण्यात येईल. बांग्लादेशातील भारतीय उच्चायोग आणि चितगाव, राजशाही, खुलना, सिलहट येथील वाणिज्य दुतावासांतील राजकीय उपस्थिती कमी करण्यात आली आहे. आवश्यक नसणारे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना माघारी बोलावण्यात आले आहे.

धक्कादायक! बनावट कागदपत्रांच्या आधारे घुसखोरी; बांग्लादेशी कुटुंब सापडल्याने BSF अलर्ट

अशा परिस्थितीतही भारतीय उच्चायोग अजूनही कार्यरत आहे आणि आवश्यक तितके कर्मचारी, वरिष्ठ राजनयिक येथे आहेत. कोणत्याही देशाबरोबर राजनयिक संबंध प्रस्थापित करण्यात दूतावासाची भूमिका महत्वाची असते. मिळालेल्या माहितीनुसार दूतावास दुसऱ्या देशांत राहणाऱ्या नागरिकांना मदत करतो. जगातील जवळपास 121 देशांत भारतीय दूतावास आहेत. या व्यतिरिक्त अनेक देशात वाणिज्य दूतावासही सुरू करण्यात आले आहेत. याच दूतावासांच्या माध्यमातून भारत यात्रा करण्यास इच्छुक असणाऱ्या विदेशी नागरिकांना व्हिसा दिला जातो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube