काय सांगता! एका माकडाने अख्खा देश टाकला अंधारात; श्रीलंकेतील ब्लॅकआऊटचं सत्य काय?
Power Cut in Sri Lanka : भारताचे सर्वच शेजारी देश सध्या कमालीचे अशांत झाले आहेत. प्रत्येक देशात काहीनाकाही संकटे आहेत. आर्थिक संकटातून सावरत असलेल्या श्रीलंकेच्या अडचणी अजूनही (Sri Lanka News) कमी झालेल्या नाहीत.आताही एक धक्कादायक बातमी या देशातून आली आहे. मागील दोन दिवसांपासून श्रीलंकेत ब्लॅक आऊट (Sri Lanka Blackout) आहे. यामुळे राजधानी कोलंबोसह देशातील अनेक शहरांत वीज पुरवठा ठप्प झाला आहे. या शहरांत अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु, यश येताना दिसत नाही. घरातील फॅन, कुलर सगळे काही बंद असल्याने उकाड्याने लोक हैराण झाले आहेत.
9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजतना अचानक वीज पुरवठा खंडीत झाला. सुरुवातीला लोकांनी गांभीर्याने घेतले नाही. नेहमीसारखा वीज पुरवठा खंडीत झाला असेल असेच लोकांना वाटले. परंतु, असे नव्हतेच. संपूर्ण देशातच वीज पुरवठा खंडीत झाला होता. हा वीज पुरवठा का खंडीत झाला या प्रश्नाचं उत्तर थोडं आश्चर्यकारक आहे. परंतु, विश्वास ठेवावा लागेल कारण उत्तर श्रीलंका सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने दिलं आहे. मंत्रालयानुसार हा देशव्यापी पावर कट एका माकडामुळे झाला.
श्रीलंका, नेपाळ, बांग्लादेश अन् पाकिस्तान.. चीनच्या मित्रांनी घेरलाय भारत!
सरकारच्या माहितीवर विश्वास ठेवला तर यामागे एक माकड आहे. कोलंबोतील पावर स्टेशनमध्ये एक माकड घुसले होते. त्याने या ठिकाणी काहीतरी गडबड केली. त्यामुळे पावर स्टेशन बंद झाले. आता याच माकडामुळे पूर्ण देशात ब्लॅकआऊट झाल्याचा दावा केला जात आहे. परंतु, सरकारच्या या दाव्याची येथील मीडियानेच पोलखोल केली आहे.
स्थानिक मीडियाचा दावा काय
वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर स्थानिक वृत्तपत्र डेली मिररमध्ये एक रिपोर्ट प्रकाशित झाला आहे. माकडामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याच्या सरकारी यंत्रणांच्या दाव्यावर या रिपोर्टमध्ये संशय व्यक्त करण्यात आला आहे. श्रीलंकेला स्वतःचे पावर ग्रीड अपडेट करण्याची गरज असल्याचे रिपोर्ट इंजिनिअर अनेक दिवसांपासून सरकारला पाठवत होते. जर पावर ग्रीड अपडेट केले नाही तर ब्लॅक आऊटची समस्या वारंवार उद्भवू शकते असा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे श्रीलंकेत आता जो ब्लॅक आऊट झाला आहे त्यामागे एका माकडाचा कारनामा कारणीभूत आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आज भारत-श्रीलंका दोनदा भिडणार! आधी फायनल नंतर सीरिज सामना; वेळेतही बदल