कॅनडाने भारतासमोर गुडघे टेकले; राजदुताची दुसऱ्या देशांत रवानगी
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामध्ये संबंध बिघडल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. भारताने राजदूतांची हकालपट्टी केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता भारताने कॅनडाला आपले राजदूत कमी करण्यासाठीचा वेळी दिला होता. त्यानंतर आता कॅनडाने भारतात काम करणाऱ्या राजदूतांची सिंगापूरला रवानगी केली आहे. एका वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.
गोरेगाव दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमागे भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला. या गंभीर आरोपांनंतर दोन्ही देशातील संबंधात तणाव शिगेला पोहोचला. भारतानेही पुढील आदेशापर्यंत कॅनडियन नागरिकांना व्हिसा देण्यास बंदी घातली. ट्रुडो यांच्या आरोपांनंतर आतापर्यंत अनेक घडामोडी घडल्या होत्या.
राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांना ‘हे’ आदेश…
निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याच्या आरोपांनंतर कॅनडा सरकारने तेथील ओटावा येथील सर्वोच्च भारतीय राजदूत पवन कुमार राय यांना निलंबित केले. कॅनडाच्या या कारवाईला त्याच भाषेत भारताकडून प्रत्युत्तर देत कॅनडाचे नवी दिल्लीतील उच्चायुक्त कॅमेरून मॅके यांची हकालपट्टी करण्यात आली. तसेच त्यांना 5 दिवसांत देश सोडण्यासही सांगण्यात आले.
Pune News: धक्कादायक! पुण्यात माजी नगरसेविकेला धमकावून अत्याचार
हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचे म्हणत कॅनडाच्या भूमीवर कॅनेडियन नागरिकाच्या हत्येमध्ये कोणत्याही परदेशी सरकारचा सहभाग हे आमच्या सार्वभौमत्वाचे अस्वीकार्य उल्लंघन असल्याचे ट्रुडो यांनी संसदेत म्हटले होते. मात्र, ट्रुडो यांनी केलेले सर्व आरोप भारताकडून फेटाळण्यात आले. तसेच ट्रूडो यांनी केलेले आरोप म्हणजे कॅनडात आश्रय घेत असलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे.
ट्रुडो यांच्या विधानानंतर ओटावा येथील सर्वोच्च भारतीय राजदूत पवन कुमार राय यांची हकालपट्टी करण्यात आली. ते पंजाब केडरचे 1997 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून, सध्या ते कॅनडातील भारतीय गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंगमध्ये (RAW) स्टेशन चीफ म्हणून कार्यरत होते. यानंतर भारताने याला प्रत्युत्तर देत परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीस्थित कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरून मॅके यांची हकालपट्टी करत त्यांना 5 दिवसांत देश सोडण्याचे आदेश दिले.
राय यांची हकालपट्टी करण्याच्या कॅनडा सरकारच्या निर्णयानंतर भारताकडूनही याच भाषेत प्रत्युत्तर देण्यात आले. भारताच्या या कारवाईनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची भूमिका काहीशी मवाळ झाली. भारत सरकारने हा मुद्दा योग्यरित्या हाताळावा अशी भूमिका ट्रुडो यांनी घेतली