काय सांगता! कामचुकार अन् आळशी अधिकाऱ्यांना पुरस्कार; कामकाज सुधारण्यासाठी खटाटोप

China News : जर तुम्हाला ऑफिसमध्ये कुणी दिवसभर सुस्त बसलेले दिसून आले, कामात टाळाटाळ करताना दिसून आले किंवा मीटिंगमध्ये फक्त हा किंवा ना करत राहिलेला कर्मचारी दिसल्यास काय होईल. कदाचित बॉसचे बोलणे खावे लागतील किंवा कामाचा ताण आणखी वाढेल या गोष्टी भारतात घडणे शक्य आहे. पण चीनमध्ये नाही. कारण चीनने अशा कामचुकार लोकांसाठी वेगळीच शक्कल लढवली आहे. कामचुकार अधिकाऱ्यांना ‘स्नेल अवॉर्ड’ आणि ‘लेइंग फ्लॅट र’ (काम टाळणारे) यांसारखे टॅग दिले जात आहेत. चीनची ही रणनीती अनोखी नक्कीच आहे पण यावरही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारी कामकाजात सुधारणा करण्यासाठी हा उपाय खरेच योग्य आहे का? यामुळे सरकारी कामकाजात सुधारणा होणार का?
चीन असे का करतोय?
चीन सरकार सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. स्थानिक सरकारांना नवीन योजना, गुंतवणुकीवर अधिक भर देण्याची गरज आहे. पण सरकारी अधिकारी जोखीम घेण्यास तयार नाहीत. चीन सरकारच्या कठोर धोरणांचा सामना करावा लागू नये यासाठी असे केले जात आहे. अधिकाऱ्यांना अशी भिती आहे की जर यांनी पुढाकार घेतला तर आणि योजना चुकीची ठरली तर त्यांचे करियरच उद्धवस्त होईल. याच कारणामुळे अधिकारी मोठा निर्णय घेण्यास टाळाटाळ करत आहेत. यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे.
हातात बेड्या अन् पायांत साखळदंड, अवैध प्रवाशांचं वास्तव.. व्हाइट हाउसनेच जारी केला Video
स्नेल अवॉर्ड अन् लेइंग फ्लॅट र टायटल नेमकं काय?
जियांगसू प्रांतातील बिनहाई काउंटीत 26 जुलै रोजी सात अधिकाऱ्यांना ‘लेइंग फ्लॅट र’ यादीत टाकण्यात आले. सर्वसामान्य नागरिक आणि अधिकाऱ्यांच्या सहकाऱ्यांच्या गुप्त मतदानानंतर घेण्यात आला. ज्या अधिकाऱ्यांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली त्यांना आळशी टॅग देण्यात आले. एक अधिकारी तर असा होता की त्याला 50 टक्के मते मिळाली. या यादीत सहभागी लोकांवर आरोप होता की ते खूप सुस्त होते. काम करण्यात कंटाळा करत होते आणि ऑफिसमध्ये हजर असल्याचे नाटक करत होते. काहींवर तर ऑफिसमधून गायब राहणे आणि फक्त आराम करण्याचेही आरोप होते.
अन्य राज्यांतही आळशी लोकांचा शोध
चीनमधील हुनान, हेनान आणि गुइझोउ यांसारख्या अनेक प्रांतात सरकारी अधिकाऱ्यांची तपासणी होत आहे. हुनानमधील हांशो काउंटीमध्ये सरकारी अधिकाऱ्यांना चार वर्गात विभागण्यात आले. प्रामाणिकपणे काम करणारे (प्रॅक्टिकल), फक्त गप्पा मारणारे (गॉसिप), कामाऐवजी फक्त खोड्या काढणारे (मिसचिवीयस) आणि कार्यालयात फक्त बसून राहणारे काहीच काम न करणारे (लेइंग फ्लॅट र) अशा चार गटात या अधिकाऱ्यांची विभागणी करण्यात आली.
आतापर्यंत 345 अधिकाऱ्यांना प्रॅक्टिकल गटात टाकण्यात आले. 15 जणांना गॉसिप, 6 जणांना मिसचीवियस आणि 62 जणांना लेइंग फ्लॅट र घोषित करण्यात आले. या आळशी आणि कामचुकार अधिकाऱ्यांना आता कामात सुधारणा करण्याची ताकीद देण्यात आली आहे.
तज्ज्ञ लोकांचे म्हणणे आहे की अशा पद्धतीची यादी आणि स्नेल अवॉर्ड यांसारख्या कामांमुळे थोड्या काळासाठी याचा परिणाम दिसू शकतो. पण हा कायमस्वरूपीचा तोडगा नाही. एक ठोस कार्यप्रणाली तयार करण्याची खरी गरज आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवता येईल. लोकांना काय वाटते याचाही विचार करता येईल आणि अधिकाऱ्यांना योग्य दिशेने काम करण्यासाठी प्रोत्साहित करता येईल. काही तज्ञांना वाटते की हा निर्णय वादग्रस्त ठरू शकतो. यासाठी जर योग्य मापदंड निश्चित केले नाही तर निर्दोष कर्मचारी सुद्धा आळशी घोषित केले जाऊ शकतात.
बराक ओबामा समलैंगिक अन् मिशेल ओबामा पुरुष; एलन मस्कच्या वडिलांचं वादग्रस्त वक्तव्य