Playboy Magazine : महिलांना त्यांच्या शरीरासोबत हवं ते करण्याचं स्वातंत्र्य, प्लेबॉयवर झळकलेल्या फ्रान्सच्या मंत्र्यांचं उत्तर

Playboy Magazine : महिलांना त्यांच्या शरीरासोबत हवं ते करण्याचं स्वातंत्र्य, प्लेबॉयवर झळकलेल्या फ्रान्सच्या मंत्र्यांचं उत्तर

पॅरिस : फ्रान्समध्ये इमॅन्युएल मॅक्रोन (Emmanuel Macron) यांच्या नेतृत्वातील सरकारच्या सामाजिक अर्थव्यवस्था खात सांभाळणाऱ्या महिला मंत्री मर्लिन स्कॅपा (Marlene Schiappa) यांचा प्लेबॉय (Playboy) या मासिकाच्या कव्हरपेजवर झळकला आहे. त्यामुळे फ्रान्ससह जगभरात याची चर्चा आणि वाद सुरू झाला आहे. यावर स्कॅपा यांच्याच पक्षातील अनेकांनी टीका केली आहे. तर या टीकेला उत्तर देण्यासाठी त्यांनी थेट 12 पानी मुलाखतच दिली आहे. या मुलाखतीत त्या काय म्हणाल्या? प्लेबॉय मासिकाने ताय म्हटले आहे? सविस्तर जाणून घेऊ…

प्लेबॉय मासिक हे महिलांचे आकर्षक फोटो सादर करण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. महिलांबाबतचा आक्षेपार्ह कंटेन्टसाठी हे मासिक ओळखलं जात. मात्र आमचं हे मासिक सॉफ्ट पॉर्न नसल्याचं मासिकडून स्पष्ट केलं आहे. तसेच त्यांनी असं देखील म्हटलं आहे की, इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या सरकारमधील मर्लिन स्कॅपा याचं या मासिकाच्या पहिल्या पेजवर झळकण्यास योग्य होत्या. त्या अनेक वर्षांपासून महिलांच्या हक्कासाठी लढत आहेत. त्याच महिलांचा आवाज बनु शकतात.

दरम्यान सध्या फ्रान्समध्ये सेवानिवृत्तीचं वय दोन वर्षांनी वाढवण्याच्या योजनेविरोधात आंदोलन आणि हिंसक निदर्शनांचा मॅक्रोन सरकारला सामना करावा लागत आहेत. तर आता निर्माण झालेला सामाजिक अर्थव्यवस्था खात सांभाळणाऱ्या महिला मंत्री मर्लिन स्कॅपा यांचा प्लेबॉय (Playboy) मासिकाचा वाद देखील सरकारला अडचणीत आणणारा ठरतोय.

पॉर्नस्टार, पैसा आणि डोनाल्ड ट्रम्प; डोनाल्ड ट्रम्प यांना अटक होणार? काय आहे प्रकरण

सरकारला मर्लिन स्कॅपांच्या या कृत्यामुळे अडचणींचा सामना करवा लागत असल्याने स्कॅपांच्या पक्षातीलच लोकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यावर तर या टीकेला उत्तर देण्यासाठी त्यांनी थेट 12 पानी मुलाखतच दिली आहे. यामध्ये त्या म्हणाल्या की, महिलांना त्यांच्या शरीरासोबत हवं ते करण्याचं स्वातंत्र्य आहे. यावेळी त्यांनी सोशन मिडीयावर प्लेबॉय मासिकावर झळकलेला त्यांचा फोटो देखील पोस्ट केला आहे. त्याचबरोबर त्यांनी या मुलाखतीत समलैंगिक आणि महिला अधिकारांवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. तसेच प्लेबॉयवरून टीका करणाऱ्यांना त्यांनी जर मागासलेल्या विचारसरणीच्या लोकांना याचा त्रास होत असेल तर त्यांनी तो करुन घ्यावा. असं उत्तर दिलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube