दिलीप महालनोबिस यांना पद्मविभूषण, तर परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार

दिलीप महालनोबिस यांना पद्मविभूषण, तर परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार

नवी दिल्ली : दिलीप महालनोबिस यांना पद्मविभूषण, परशुराम खुणे यांना पद्मश्री यांच्यासह 26 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय. महाराष्ट्रातून झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे (Zadhipatti ke Parshuram Komaji) यांच्यासह 26 जणांचा पद्म पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

केंद्र सरकारने आज पद्म पुरस्कारांची घोषणा केली. त्यामध्ये एक पद्मविभूषण तर 25 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. ओआरएसचे निर्माता दिलीप महालनोबिस यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

यामध्ये रतन चंद्रकार, हिराबाई लोबी, मुनिश्वर चंदरदवर, रामकोईवांग्बे नेव्मे, व्ही. पी. अप्पुकुट्टान पुडवाल, सनक्रुरात्री चंद्रा शेखर, वेडीवेल गोपाल आणि मासी सदियान, तुलाराम उपरेती, निक्रम शर्मा, जानूमसिंग स्वाय, धनिराम टोटो, बीरामकृष्ण रेड्डी, अजयकुमार मांदवी, राणी मचायी, के.सी. रुन्रेमसंगी, रिसिंगबोर कुरुलांग, मंगलक्रांती रॉय, मोआ शुभांग, मुनिवेन्टाप्पा, डोमर सिंग कुंवर, परशुराम कोमाजी कुन्हे, गुलाम मोहम्मद जाज, बानूबाई चितारा, कपिल देव प्रसाद ,परेश राथवा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

तसेच मुलायम सिंग यादव, एस एम कृष्णा या राजकीय नेत्यांसह काल निधन पावलेले ज्येष्ठ वास्तू विशारद बाळकृष्ण दोशी, ज्येष्ठ तबलावादक झाकीर हुसेन, ज्येष्ठ शास्त्रज्ञ दिलीप महालनोवीस (मरणोत्तर) यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

तर महाराष्ट्रातून एक नाव या यादीत आहे, ते म्हणजे परशुराम खोणे. परशुराम खोणे हे झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार असून त्यांनी आतापर्यंत 800 हून अधिक नाटकांमध्ये काम केलंय. दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर केला जातो. केंद्र सरकारकडून एकूण 26 जणांना पद्म पुरस्कारांने गौरविण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube