आरोप करणारी पॉर्न स्टारच डोनाल्ड ट्रम्पच्या मदतीसाठी धावली…

Untitled Design   2023 03 21T171516.549

Donald Trump Stormy Daniels case: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एका पॉर्नस्टारला पैसे दिल्याच्या प्रकरणावरून गोत्यात सापडले आहे. ट्रम्प यांच्यावर पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने काही आरोप केले आहे. दरम्यान याप्रकरणामुळे ट्रम्प यांना आगामी निवडणूक लढवण्यात अडचणी निर्माण होणार तोच त्यांच्या मदतीसाठी खुद्द पॉर्नस्टार स्टॉर्मी ही धावली आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेत पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

नेमकं प्रकरण काय ? जाणून घ्या
पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काही आरोप केले आहे. ट्रम्प आणि आपल्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आहे. ट्रम्प यांनी याप्रकरणावर आपण भाष्य करू नये यासाठी आपल्याला काही रक्कम देखील देऊ केली आहे. तिच्या या आरोपानंतर ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ झाली. दरम्यान या प्रकरणी सध्या खटला सुरु असून ट्रम्प याचा सामना करत आहे.

ट्रम्प यांच्या बचावासाठी स्टॉर्मी धावली
पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्स म्हणाली की, ट्रम्प यांच्यावरील आरोप असे नाहीत की त्यांना याप्रकरणी जेलमध्ये पाठवावे. मात्र, माजी राष्ट्रपतींवरील इतर प्रकरणांतील आरोप गंभीर असतील आणि त्यांचा तपास झाल्यानंतर ते सिद्ध झाले तर त्यांच्यावर कारवाई करत त्यांना तुरुंगात पाठवावे, असेही डॅनियल्स यांनी म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 34 आरोप
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मॅनहॅटनच्या न्यायालयात 34 आरोप ठेवण्यात आले. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला गप्प करण्यासाठी पैसे दिल्याबद्दल आणि निवडणूक प्रचारादरम्यान बिझनेस रेकॉर्ड खोटे केल्याबद्दलही त्याच्यावर खटला सुरू आहे.

कर्नाटकात ‘या’ पक्षाचे सरकार येणार… शरद पवारांचे मोठे विधान

आपण दोषी नाही…
कोर्टात बोलताना ट्रम्प यांनी आपण दोषी नसल्याचे न्यायाधीशांना सांगितले. ट्रम्प यांचे वकील टॉड ब्लँचे म्हणाले, ट्रम्प खूप अस्वस्थ आहेत आणि त्यांना वाटते की कोर्टरूममध्ये त्यांच्यावर अन्याय होत आहे. आपण कोणताही गुन्हा केला नसल्याचे ट्रम्प यांनी सांगितले होते. दरम्यान मॅनहॅटन कोर्टाने ट्रम्प यांच्या जामीन किंवा अटकेबाबत कोणताही निर्णय दिलेला नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube