दक्षिण अमेरिका हादरली! चिली अन् अर्जेंटिनामध्ये ७.४ तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचाही इशारा

Earthquake

Chile-Argentina Earthquake: थायलंड आणि म्यानमारमध्ये अलीकडेच झालेल्या भूकंपानंतर आज अर्जेंटिना (Argentina Earthquake) आणि चिली या दोन्ही देशांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या दोन्ही देशात शुक्रवारी देशात ७.४ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने (United States Geological Survey) दिली. या भूकंपानंतर तिथे त्सुनामीचा (Tsunami) इशाराही देण्यात आला.

आर्थिक फसवणूकी विरोधात सरकारचा अॅक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आर्थिक गुप्तचर युनिट’ कार्यान्वित 

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र अर्जेंटिनाच्या उशुआइयापासून २१९ किलोमीटर दक्षिणेस समुद्राखाली होते. या भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळं अर्जेंटिनाची जमीन हादरली आहे. अर्जेंटिना व्यतिरिक्त, चिलीचे काही भाग देखील त्याच्या कक्षेत येतात.
दरम्यान, भूकंपाची तीव्रता लक्षात घेता, त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोक घराबाहेर पडून मोकळ्या जागांमध्ये जात आहेत. या संदर्भातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

आर्थिक फसवणूकी विरोधात सरकारचा अॅक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आर्थिक गुप्तचर युनिट’ कार्यान्वित 

या भूकंपामुळे अद्याप कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तथापि, अधिकाऱ्यांनी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेच्या त्सुनामी इशारा यंत्रणेने भूकंपाच्या केंद्रापासून ३०० किलोमीटर अंतरापर्यंतच्या किनारी भागात धोकादायक लाटांचा इशारा दिला. तर चिली प्रशासनानेही देशाच्या दक्षिण किनारपट्टी भागात त्सुनामीचा इशारा दिलाय. तेथील रहिवाशांना तात्पुरते स्थलांतर करण्याचा सल्ला देण्यात आला.

चिलीच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण आणि प्रतिसाद सेवेने सांगितले की, देशाच्या दक्षिणेकडील टोकावरील मॅगालेन्स प्रदेशातील किनारी भाग त्सुनामीच्या धोक्यामुळे रिकामा करण्यात येत आहे. चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनीही जनतेला मॅगालेन्स प्रदेशातील किनारी भाग रिकामा करण्याचे आवाहन केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube