भारत-ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, परदेशी वस्तू स्वस्त होणार; ‘या’ लोकांना होणार फायदा

भारत-ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, परदेशी वस्तू स्वस्त होणार; ‘या’ लोकांना होणार फायदा

India- UK Free Trade Agreement : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ब्रिटन दौऱ्यावर असून या दौऱ्यावर पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमरसोबत (Keir Starmer) ऐतिहासिक करार केला आहे. दोन्ही देशांनी मुक्त व्यपार करारवर (FTA) स्वाक्षरी केली आहे. या करारानंतर दोन्ही देशांमधील वस्तूंचा व्यवहार आणि व्यापार पूर्वीपेक्षा सोपा आणि स्वस्त होणार आहे.

तर दुसरीकडे या करारानंतर भारतीय बाजारपेठेत परदेशी वस्तू स्वस्त होणार आहेत तर भारतातून निर्यातीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या व्यापारी आणि तज्ञांनी या कराराचे स्वागत केले आहे.

 करारामुळे काय बदल होणार?

मुक्त व्यापार करारामुळे (India- UK Free Trade Agreement) भारत आणि ब्रिटनमधील वस्तू आणि सेवांवरील कर (शुल्क) कमी होणार आहे. तर कागदपत्रे आणि कठीण सरकारी प्रक्रिया देखील सोप्या केल्या जाणार आहे. यामुळे भारताची निर्यात 60% पर्यंत वाढू शकते.

कोणाला फायदा होईल?

या कराराचा फायदा डाळी, तांदूळ, सुकामेवा, मसाले इत्यादी अन्नपदार्थ पाठवणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना आणि ब्रिटनमध्ये अशा वस्तू खरेदी करणाऱ्या लोकांना होणार आहे. तर दारू, बिअर आणि अन्नपदार्थांचे व्यवहार करणाऱ्या कंपन्यापूर्वी भारतातून दारू पाठवण्यावर 150% कर होता, आता तोही कमी केला जाईल. आता दोन्ही देशांमध्ये वाहने, कपडे, तंत्रज्ञान उत्पादने यासारख्या अनेक गोष्टी पूर्वीपेक्षा स्वस्त मिळू शकतात. दोन्ही देशांमध्ये नोकऱ्या वाढण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी, थायलंडचा कंबोडियावर हवाई हल्ला, 9 जणांचा मृत्यू तर 2 लष्करी तळ उद्ध्वस्त 

पुढे काय होईल?

हा करार ब्रिटनच्या संसदेत मांडला जाईल. तिथून औपचारिक मंजुरी मिळाल्यानंतर, काही महिन्यांत तो लागू होईल. असा अंदाज आहे की 2030 पर्यंत भारत आणि ब्रिटनमधील परस्पर व्यापार दुप्पट होऊन सुमारे 120 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube