Sudan Clash : लष्कर पॅरामिलिटरीत तुफान गोळीबार ! भारतीयांना घरातच राहण्याच्या सूचना
Sudan Clash: आफ्रिकन देश सुदानमध्ये (Sudan Clash) लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. येथे विमानतळेही ताब्यात घेतली गेली आहेत. गोळीबारीच्या घटना होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. या घटना पाहता या देशातील भारतीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकार अलर्ट झाले आहे. आफ्रिकन देशात लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सुदानमध्ये राहणाऱ्या भारतीयांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
The Embassy of India in Sudan advises Indians to stay indoors in view of reported firings and clashes in the country pic.twitter.com/41tESh5r0v
— ANI (@ANI) April 15, 2023
“गोळीबार आणि चकमकी लक्षात घेता सर्व भारतीयांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. घरामध्येच रहा आणि बाहेर जाणे थांबवा. कृपया शांत राहा आणि पुढील आदेशाची प्रतिक्षा करा,” असे खारतूममधील भारतीय दूतावासाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. सैन्य आणि देशाच्या निमलष्करी दलांमध्ये वाढलेल्या तणाव दरम्यान सुदानची राजधानी खारतूम मध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे.
‘भारतविरोधी शक्तीवर कारवाई करा’ पंतप्रधान मोदींची ऋषी सुनक यांच्याशी चर्चा
सुदानच्या निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्सने देशाच्या अध्यक्षांचा राजवाडा, लष्करप्रमुखांचे निवासस्थान आणि खारतूमचे विमानतळ ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे, असे वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले आहे.सुदानच्या निमलष्करी दलाने असा दावा केला आहे की या संघर्षात आतापर्यंत देशातील अनेक महत्वाच्या ठिकाणांवर ताबा मिळवला आहे.