होर्मुझमधील गोळीबारावर इराणचे स्पष्टीकरण; युद्ध नको, संवादातून तोडगा काढण्याचा आग्रह

आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला शांतता हवी आहे. या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा निघेल, अशी आम्हाला आशा आहे, असे देखील ते म्हणाले.

  • Written By: Published:
Untitled Design 3

Iran’s explanation on the shooting : अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मूझ सामुद्रधुनी परिसरात परिस्थिती अत्यंत चिघळलेली दिसत आहे. अमेरिकेने या महत्वाच्या जलमार्गावरील नाकेबंदी उठवण्यास नकार दिल्यानंतर इराणने देखील प्रत्युत्तरादाखल समुद्रधुनीवर पुन्हा निर्बंध लादत ती बंद करण्याचा निर्णय घेतला. या वाढत्या तणावात भारतीय जहाजांवर गोळीबार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

ओमानच्या ईशान्येस सुमारे 25 सागरी मैलांवर असताना भारताचे मालवाहतूक जाहज जग अर्णव आणि तेलवाहू जहाज सनमार हेराल्ड यांना इराणच्या इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सकडून मार्ग बदलण्याचे आदेश देण्यात आले. याच दरम्यान या जहाजांवर गोळीबार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र या प्रकारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणचे राजदूत डॉ. मोहम्मद फताली यांना तातडीने समन्स बजावले. यानंतर भारतातील इराणचे वरिष्ठ प्रतिनिधी डॉ. अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. हैद्राबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारत-इराण संबंध अतिशय मजबूत असल्याचे सांगितले. मात्र, या गोळीबाराच्या घटनेबाबत सध्या स्पष्ट माहिती नसल्याचे त्यांनी नमूद केले. आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला शांतता हवी आहे. या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा निघेल, अशी आम्हाला आशा आहे, असे देखील ते म्हणाले.

सर्जेराव ज्या ताटात जेवलात त्याच ताटात घाण करायची नसते; महिला आरक्षणावरून काँग्रेसचा तांबे यांच्यावर निशाणा

दरम्यान, मरिन ट्रॅफिकच्या ट्रेकिंग डेटानुसार, ही दोन्ही जहाजे ठरलेल्या मार्गाने जात असताना लारक बेटाजवळ त्यांचा वेग अचानक कमी झाला. त्यानंतर त्यांनी यु-टर्न घेत ओमानच्या समुद्राच्या दिशेने मार्ग बदलला. याच वेळी इराणच्या गनबोटीतून गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सनमार हेराल्ड हे टँकर पूर्ण क्षमतेने तेलाने भरलेले असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचं समोर आलं आहे.

ब्रिटनच्या सागरी सुरक्षा संस्थेने, युनायटेड किंगडम मॅरीटाईम ट्रेड ऑपरेशन्सने देखील टँकरवर गोळीबार झाल्याची पुष्टी केली आहे. या पार्श्वभूमीवर होर्मूझ समुद्रधुनीतील परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनली असून, जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यावर त्याचे मोठे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

follow us