India Maldives Relations : मालदिवबरोबर पुन्हा पक्की दोस्ती ! भारताकडून साडेसहा हजार कोटींची मदत

India Maldives Relations : मालदिवबरोबर पुन्हा पक्की दोस्ती ! भारताकडून साडेसहा हजार कोटींची मदत

India Maldives Relations : भारत-मालदीवमध्ये मुक्त व्यापार करण्याच्या कराराला मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती समोर आलीयं. हैद्राबादेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्यासोबत मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर कराराला मंजुरी मिळाल्याचं समोर आलंय. या करारानूसार मालदीवला भारतीय युपीआय. नवीन वाणिज्य दुतावास, संरक्षण मजबूत करण्यासाठी पायाभूत सुविधांसाठी भारत प्रोत्साहन देणार आहे.

भाजप नेत्यांनी चांगली वागणूक दिली पण त्यांना…; हर्षवर्धन पाटलांनी A टू Z सगळचं सांगितलं

पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर असलेले मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइझू यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भारताला विरोध करणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या चर्चेत राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईज्जू यांनी भारतासोबत सर्वच क्षेत्रात मुक्त व्यापार करण्यास तयार असल्याची शाश्वती दिलीयं. यासोबतच त्यांनी भारतातील पर्यटकांना मालदीव येण्यासाठी आवाहनदेखील केलं असून मालदीवला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मदतीसाठी मोदींचं कौतूक करीत आभार मानले आहेत.

‘निवडणुकीच्या तोंडावर जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न…’; पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर हल्लाबोल

6400 कोटींचं पॅकेज

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्यात एकूण पाच करारांवर शिक्कामोर्तब झालं. यामध्ये मालदीवच्या संकट परिस्थितीला सावरण्यासाठी एकूण 6400 कोटी रुपयांच्या पॅकेजचा समझौता करार झाला आहे. यामध्ये मालदीवचे चलन बदलण्यासाठी 40 कोटी डॉलर्स आणि 3 कोकटी रुपयांचे भारतीय चलन उपलब्ध करुन देण्याचा करारा झाला आहे. या करारामुळे मालदीवला विदेशी चलनांपासून दिलासा मिळणार आहे.

मालदीवमध्ये रुपे कार्ड कार्ड चालणार असून युपीआयलाही सुरुवात
समुद्र सुरक्षेसाठी सहकार्याला परवानगी
दोन्ही देशांत नवीन दुतावास असणार
मालदीवमध्ये विमानांच्या लॅंडिगसाठी मदत
भारत-मालदीवमध्ये मुक्त व्यापार करा

एकनाथ शिंदे हेच महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा…; संजय शिरसाटांचे मोठे विधान

मालदीवच्या इन्फ्रास्टक्चर विकासासाठी भारत कटिबद्ध असून हनीमाधू आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर भारताच्या मदतीने नव्या रनवेचे उद्धघाटन पार पडलं. भारताच्या मदतीने 700 पेक्षा अधिक निवासांची चावी मालदीवकडे सोपवण्यात आलीयं. मालदीवच्या 28 आइलॅंडवर पाणी आणि सीवरेज प्रकल्प पूर्ण केले आहेत. मालदीवमध्ये रुपे कार्डही स्विकारलं जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, पुढील काळात युपीआयचे मालदीवमध्ये स्विकार होणार आहे.

दरम्यान, भारताविरोधात आवाज उठवणाऱ्या मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांचा सूर बदलला आता बदलल्याचं दिसून येत आहे. मोहम्मद मुइज्जू आणइ त्यांची पत्नी साजिदा मोहम्मद 4 दिवसीय भारताच्या दौऱ्यावर आहेत. मुइज्जू यांनी सोमवारी हैदराबाद भवनमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतली. संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने दोन्ही देशांनी सोमवारी 400 दशलक्ष डॉलर्सच्या करन्सी करारावर स्वाक्षरी केली. यामुळे आता मालदीवला परकीय चलनाच्या साठ्याशी संबंधित समस्या हाताळण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांचं आज सोमवार रोजी सकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आलं. मालदीवच्या राष्ट्रपती आणि प्रथम महिला साजिदा मोहम्मद यांचं आज राष्ट्रपती भवनात आगमन झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केलं.

राष्ट्रपती मुइझ्झू आणि साजिदा मोहम्मद यांनी नवी दिल्लीतील राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. महात्मा गांधी स्मारकावर आदरांजली वाहल्यानंतर मुइझ्झू यांनी राजघाटावरील अभ्यागतांच्या पुस्तकावर स्वाक्षरीही केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube