बारमधून बाहेर काढलं; संतप्त युवकाने नशेत बिल्डिंग दिली पेटवून; 11 जणांचा होरपळून मृत्यू
नशेत गैरवर्तन करणाऱ्या युवकाला बारमधून बाहेर काढल्याने रागात बारची संपूर्ण बिल्डिंगच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात बारमधील 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. मेक्सिकोच्या उत्तर भागातील सॅन लुईस रियो कोलोराडो या शहरात शनिवारी (स्थानिक वेळेनुसार) ही घटना घडली. ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती स्टेट अॅटर्नी जनरल यांनी दिली. (11 people died inside the bar when a drunk young man sets fire to the entire building of the bar)
#Breaking #Sonora Check the level of violence. Man thrown out of the bar in Mexico sets the bar ablaze with a "molotov" cocktail, killing 11 people.
So far, the attacker has not been arrested.#Mexico #MexicoCity pic.twitter.com/AQdsfgkbat
— X News (@X_news___) July 22, 2023
याबाबत सोनोरा अटॉर्नी जनरल यांच्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आरोपीने बारमध्ये आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मद्यप्राशन केलं. तो भरपूर नशेत होता. नशेत तो बारमधील इतर महिलांशी गैरवर्तन करत होता. यामुळे व्यवस्थापनाने त्याला बारमधून बाहेर काढलं. मात्र यामुळे आरोपी चांगलाच संतप्त झाला. त्याने मोलोटोव्ह कॉकटेलचा वापर करुन बार पेटवून दिला. हे कॉकटेल त्याने बारच्या दरवाज्यावर आणून फेकले. यानंतर दरवाजा पेटला आणि आग वेगाने पसरली.
Bangladesh Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस तलावात कोसळली; 17 जणांचा जागीच मृत्यू
अचानक आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. त्यामुळे अनेकांना बाहेर पडण्यास संधीच मिळाली नाही. यामुळे या दुर्घटनेत तब्बल 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. यातील एक महिला अमेरिकन नागरिक आहे तसंच एका 17 वर्षीय मुलीचाही समावेश आहे. तर आणखी चार जणांची प्रकृती गंभीर आहे.