अमेरिका, कॅनडा विसरा बॅगा भरा अन् आमच्याकडे या; भारतीय विद्यार्थ्यांसाठी न्यूझीलंड ठरतोय बेस्ट..

Indian Students in New Zealand : भारतीय विद्यार्थी आणि गुंतवणूकदार आता कॅनडा, अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियाला नाही तर न्यूझीलंडला (Indian Students in New Zealand) अधिक प्राधान्य देत आहेत. न्यूझीलंडने विद्यार्थी व्हिसाची प्रक्रिया जलद करण्यासाठी अनेक नवीन पावले उचलली आहेत. ही धोरणे कोविडनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राबवली जात आहेत. त्याचबरोबर देशाला शिक्षण, रोजगार आणि चांगल्या जीवनशैलीसाठी एक आकर्षक ठिकाण बनविण्याचे उद्दिष्टही न्यूझीलंडने समोर ठेवले आहे. याच धोरणांचा परिणाम म्हणून विद्यार्थी आता अमेरिका, कॅनडाऐवजी न्यूझीलंडला जाणे पसंत करत आहेत.
न्यूझीलंडने 23 जून रोजी भारताला त्यांच्या पात्रता सूट यादी (List of Exempt Qualifications) मध्ये समाविष्ट केले आहे. याचा अर्थ असा की आता IIT, IISER, IIM आणि केंद्रीय विद्यापीठांसारख्या भारतीय संस्थांमधून पदवी, पदव्युत्तर किंवा पीएचडी अशा कोणत्याही अतिरिक्त मूल्यांकनाशिवाय वैध असतील. पूर्वी, आंतरराष्ट्रीय पात्रता मूल्यांकन (International Qualification Assessment) साठी 8-12 आठवडे लागायचे. त्यासाठी भरपूर खर्चही करावा लागत होता. आता ही प्रक्रिया जलद, स्वस्त आणि विद्यार्थ्यांसाठी अनुकूल झाली आहे. व्हिसा (VISA) निर्णय आता 20-25 दिवसांतच घेतले जातात.
अधिकच्या सुविधा
या व्यतिरिक्त न्यूझीलंडने विद्यार्थ्यांसाठी 12 महिन्यांचा अधिकचा अर्ज कालावधी (Extended Application Window) आणि PGDip + मास्टर्स यांचे संयोजन सुरू केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नोकरी शोधण्यासाठी अधिक वेळ मिळेल. तसेच नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी अर्धवेळ कामाचे तास आठवड्यातून 20 वरून 25 तासांपर्यंत वाढवण्यात आले आहेत.
UPI वापराबाबत मोठी अपडेट; आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्राचं सूचक वक्तव्य
नोकरी आणि इमिग्रेशनच्या संधी
न्यूझीलंडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना स्किल्ड माइग्रेंट कॅटेगरी, ग्रीन लिस्ट रोल्स, सेक्टर ॲग्रीमेंट आणि ॲक्रिडिटेड एम्प्लॉयर वर्क वीजा यांसारखे मार्ग उपलब्ध आहेत. युनिव्हर्सिटी लिव्हिंगच्या अहवालानुसार, 2030 पर्यंत 24,594 भारतीय विद्यार्थी न्यूझीलंडमध्ये शिक्षणासाठी जाऊ शकतात. जुलैमध्ये भारतातील विद्यार्थ्यांकडून येणाऱ्या चौकशीत 40% इतकी वाढ झाली आहे.
श्रीमंतांना गोल्डन व्हिसा
न्यूझीलंडने आपला गुंतवणूकदार व्हिसा कार्यक्रमही सोपा केला आहे. गुंतवणूकदारांकडे आता दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे ग्रोथ कॅटेगरी श्रेणी अंतर्गत, यात एखाद्याला 3 वर्षांत 5 दशलक्ष न्यूझीलंड डॉलर्सची गुंतवणूक करावी लागेल आणि फक्त 21 दिवस न्यूझीलंडमध्ये राहावे लागेल. दुसरी श्रेणी म्हणजे बॅलन्स्ड कॅटेगरी. याअंतर्गत 5 वर्षांत 10 दशलक्ष न्यूझीलंड डॉलर्सची गुंतवणूक आणि 105 दिवसांचा मुक्काम आवश्यक आहे.
इंग्रजी भाषा आणि वयाचे निर्बंध काढून टाकण्यात आले आहेत, ज्यामुळे अधिकाधिक लोक अर्ज करू शकतील. गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये व्यवसाय, व्यवस्थापित निधी (Managed Funds), बाँड आणि मालमत्ता यांचा समावेश आहे. एप्रिल 2025 पासून सुरू झालेल्या या नवीन प्रणालीला आतापर्यंत 236 अर्ज प्राप्त झाले आहेत जे जुन्या प्रणालीपेक्षा 105% जास्त आहे.
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, EPFO मध्ये मोठा बदल, नॉमिनीला मिळणार 50,000 रुपये