‘भारत युक्रेन-रशिया युद्धाला थांबवू शकतो’; PM मोदींच्या भेटीनंतर पोलंडच्या पंतप्रधानांनी सांगितलं…
Russo-Ukrainian War : मागील दोन वर्षांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध (Russo-Ukrainian War) सुरु असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांची भेट घेतली. या भेटीनंतर डोनाल्ड टस्क यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, भारत युक्रेन-रशिया युद्धाला थांबवू शकतो, असं पोलंडचे पंतप्रधान स्पष्टच बोलले आहेत.
फडणवीसांकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न; इक्बालसिंह चहल यांना गृह विभागात दिली मोठी जबाबदारी
डोलान्ड टस्क आणि मोदी यांच्या बैठक पार पडली. या बैठकीत टस्क यांनी रुस-रशिया युद्धासंदर्भात मोदींशी चर्चा केली. या चर्चेनंतर बोलताना टस्क म्हणाले, पंतप्रधान मोदी शांततापूर्ण आणि न्याय पद्धतीने युद्ध तत्काळ संपवण्यासाठी वचनबद्द आहेत. याचा मला आनंद आहे. रशिया युक्रेन युद्ध संपवण्यासाठी भारत सकारात्मक भूमिका बजावू शकतो, असं टस्ट यांनी स्पष्ट केलंय.
तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनला भेट देणार आहेत. त्यांची भेट ऐतिहासिक ठरणार असून संपूर्ण जग आज भारतीय लोकशाहीचं कौतूक करीत आहे. भारताची लोकशाही नियम, सीमा, प्रादेशिक अखंडता, सार्वभौमत्वाचा आदर कसा करावा हे शिकवत असल्याचं टस्क यांनी स्पष्ट केलंय.
धक्कादायक! सासरच्या जाचाला कंटाळून जावयानं संपवलं जीवन, पत्नीच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल
टस्क यांच्या भेटीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, युक्रेन आणि पश्चिम आशियामध्ये सुरु असलेला संघर्ष सर्वांसाठीच चिंतेचा विषय आहे. युद्धभूमीवर कोणतीही समस्या सोडवली जाऊ शकत नाही, यावर भारताचा ठाम विश्वास आहे. कोणत्याही संकटात निष्पाप जीव गमावणे हे संपूर्ण मानवतेसाठी मोठं आव्हान बनलं आहे. आम्ही शांतता निश्चित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही थांबलेले नाही. या युद्धात दोन्ही देशांचे अतोनात नुकसान झाले आहे. शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. पायाभूत सुविधांना मोठा फटका बसला आहे. युद्ध थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक प्रयत्न केले गेले परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अद्यापही हे युद्ध सुरुच आहे.