खोटे नॅरेटिव्ह सेट करणारेच देशाच्या विकासाचे दुश्मन; पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला
PM Modi Criticize India Alliance for Fake Narrative : लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी मुंबईचा दौरा केला आहे. या दौऱ्यात मोदींनी 29000 कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन केले. तसेच यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर (India Alliance) टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले खोटे नॅरेटिव्ह सेट (Fake Narrative) करणारे महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या गुंतवणुकीचे, इन्फ्रास्ट्रक्चरचे आणि अंतिमतः भारताच्या विकासाचे दुश्मन आहेत.
यशस्वीच्या तुफानी खेळीने भारताचा झिम्बाब्वेवर दहा विकेट्सने विजय, मालिकेवर कब्जा !
यावेळी विरोधकांवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, खोटे नॅरेटिव्ह सेट करणारे महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या गुंतवणुकीचे, इन्फ्रास्ट्रक्चरचे आणि अंतिमतः भारताच्या विकासाचे दुश्मन आहेत. मात्र आम्ही निर्माण केलेल्या रोजगारांच्या संधीमुळे याच खोटे नॅरेटिव्ह करणाऱ्या लोकांची बोलती बंद झाली. असं म्हणत इंडिया आघाडीवर टीकास्त्र सोडलं.
“करू अजून कष्ट अन् जिंकून दाखवू महाराष्ट्र”; PM मोदींना CM शिंदेंचा विधानसभा विजयाचा शब्द
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मी म्हणालो होतो एनडीए सरकार (NDA Government) तिप्पट वेगाने काम करणार आहे आणि आता हे आता सर्वजण पाहत आहे. मुंबईला आर्थिक राजधानी (Financial Capital) बनवण्याचं लक्ष्य आहे असं देखील मोदी म्हणाले. याच बरोबर महाराष्ट्राला जगातील आर्थिक केंद्र बनवण्याचं लक्ष्य आहे आणि महाराष्ट्र पर्यटन क्षेत्रात नंबर एक बनवणार असंही यावेळी मोदी म्हणाले.
पुढे नरेंद्र मोदी म्हणाले, मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराची या प्रकल्पामुळे कनेक्टिव्हिटी चांगली होईल. यांचा फायदा मोठ्या प्रमाणात राज्यातील तरुणाला होणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात राज्यात रोजगाराची निर्मिती होणार आहे. असं अश्वासन यावेळी मोदी यांनी दिलं.