मुंबई : नवीन वर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यात आलं. त्यानंतर नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात देशभरात थंडीची लाट पसरल्याचं पाहायला मिळतंय. आगामी काही दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. थंडीच्या तडाख्यानं महाराष्ट्रही चांगलाच गारठलाय. उत्तरेकडून दक्षिणेकडं वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळं वर्षाच्या पहिल्याच दिवशी थंडीची लाट पसरल्याचं दिसून आलं. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमालीची थंडी पडल्याचं पाहायला […]
राजस्थान : वांद्रे टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे 11 डब्बे आज पहाटे जोधपूर विभागातील राजकियावास-बोमदरा सेक्शन दरम्यान रुळावरून घसरले. उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, ट्रेन रुळावरून घसरल्याने 11 बोगी प्रभावित झाल्या आहेत, या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र 3 प्रवासी जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या ट्रेनमध्ये […]
मेक्सिको : जागतिक महासत्ता असलेली अमेरिका पुन्हा एकदा हादरली आहे. उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये एका कारागृहात अज्ञात बंदूकधारकांनी गोळीबार केलाय. या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळालंय. यात 10 सुरक्षारंक्षांसह चार कैद्यांचाही समावेश आहे. एका वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, रविवारी उत्तर मेक्सिकन शहरातील सिओडाड जुआरेजमधील एका तुरुंगावर अज्ञात बंदुकधारींनी हल्ला केला. त्यात 14 जणांचा मृत्यू झाला असून […]
चंदीगड : हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंह यांच्याविरोधात क्रीडा विभागाच्या ज्यूनियर महिला कोचने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संदीप सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. क्रीडा मंत्री संदीप सिंह यांच्याविरोधात एका महिला कोचचने चंदीगडमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. संदीप सिंह यांनी आपल्याविरोधात […]
नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने या भूकंपाची तीव्रता मोजली असून याची तीव्रता 3.8 इतकी असल्याचे सांगितले. मात्र या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. विशेष म्हणजे भूकंप झाला, तेव्हा लोक नववर्षाच्या जल्लोषात मग्न झाले होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने […]
नवी दिल्ली : देशात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारी 2023 पासून LPG खरेदी करणे लोकांसाठी महाग झाले आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली असून, त्यानंतर दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 1769 मध्ये उपलब्ध आहे. रविवारपासून व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ झाली आहे. यानंतर देशभरात व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, घरगुती […]