Imran Khan : पाकिस्तानात हाय होल्टेज ड्रामा, इम्रानच्या घरावर बुलडोझर; दरवाजा तोडून पोलिसांचा घरात प्रवेश

  • Written By: Published:
Imran

पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हंगामा चालू आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केली जाण्याची शक्यता वर्तवली जात असताना आज त्यांच्या घरी पोलीस पोहचले आहेत. इम्रान खान आज इस्लामाबाद न्यायालयात हजर होणार होते, मात्र न्यायालयात जाण्यापूर्वी त्यांच्या ताफ्याला इस्लामाबाद टोल प्लाझा येथे थांबवण्यात आले आहे. दुसरीकडे, इम्रान खान इस्लामाबादला रवाना झाले तेव्हा पोलीस त्यांच्या लाहोरमधील घरी पोहोचले.

पोलीस इम्रान खान यांच्या घरी पोहचली असताना पोलीस आणि पीटीआय कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली असल्याचे समोर येत आहे. इस्लामाबादला जात असताना इम्रान खान यांनी एक व्हिडिओही जारी केला. या व्हिडिओमध्ये इम्रान खान म्हणत आहेत की, मी इस्लामाबादला पोहोचल्यावर मला अटक करू. माझी अटक हा ‘लंडन प्लॅन’चा एक भाग असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

 

(बातमी अपडेट होत आहे)

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube