स्वित्झर्लंडमध्ये विमान कोसळले, पायलटसह पर्यटकांचा मृत्यूू

  • Written By: Published:
Touist Palne

Tourist plane Crash:सित्झर्लंडमध्ये पर्वतीय भागात पर्यटकांचे विमान कोसळले आहे. यात पायलट व दोन पर्यटक असा तिघांचा मृत्यू झाला आहे.पश्चिम सित्झर्लंडमध्ये शनिवारी हा अपघात झाला आहे.

तेथील स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजून २० मिनिटांनी छोट्या पर्यटक विमानाने चॉक्स-डी-फोंड्स विमानतळावरून उड्डाण घेतले होते. पर्वतीय भागात गेल्यानंतर हे विमान कोसळले आहे.स कॅन्टन न्यूचाटेलमधील पोन्ट्स-डी-मार्टेलजवळील पर्वतातील जंगलात हे विमान कोसळले असल्याची माहिती न्यूचाटेल पोलिसांनी दिली आहे.

न्यूचाटेल पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, पायलट आणि दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.हे विमान स्वित्झर्लंडमध्ये नोंदणीकृत होते.न्यूचाटेल पर्वतातील जंगलात हे विमान कोसळले आहे. डोंगराळ आणि खडतर भाग असल्याने बचाव कार्यात अडथळे येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube