पाकिस्तानात अपघातानंतर बस पेटली, 16 प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू
Pakistan : पाकिस्तानातून महत्वाची बातमी समोर येत आहे. पाकिस्तानमध्ये भीषण अपघात घडला असून या अपघातात बसला आग लागली. या आगीत तब्बल 17 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 11 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटन पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात घडली आहे. ही बस कराचीवरून निघाली होती. बसमध्ये 30 ते 40 पेक्षा जास्त प्रवासी होते. या घटनेचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बस नेमकी कुठे जात होती याबाबत मात्र निश्चित माहिती अद्याप मिळालेली नाही. बस पिंडी भाटियान जवळ पोहोचल्यानंतर बसचा अपघात झाला. बसला आग लागली. काही क्षणांतच या आगीने रौद्ररुप धारण करत सगळ्या बसलाच आपल्या कवेत घेतले. बसचा अगोदर अपघात झाला त्यानंतर बस पेटल्याचे सांगण्यात येत आहे.
माजी परराष्ट्र मंत्र्यांना अटक, पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता कायम
या घटनेत 16 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, याआधी काही दिवसांपूर्वी रेल्वेचा अपघात झाला होता. या अपघातातही अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही अशीच मोठी घटना घडली आहे. तसेही या देशात सातत्याने हल्ल्याच्य घटना घडतच असतात. त्यात आता रस्ते अपघातही वाढले आहेत. त्यामुळे रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
VIDEO: विमानाचा भीषण अपघात, दहा ठार; कसा झाला अपघात पाहा ?