Vladimir Putin यांच्या भारत दौऱ्याची घोषणा! BRICS परिषदेत सहभाग, 10 महिन्यांत दुसरा दौरा…

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या सप्टेंबर महिन्यांत भारतात BRICS परिषदेसाठी भारत दौऱ्यावर असणार आहेत,

Vladimir Putin

Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) सप्टेंबर २०२६ मध्ये भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या संदर्भात दोन्ही देशांत तयारी जोरदार सुरु आहे. क्रेमलिनने मंगळवारी याची या दौऱ्याची घोषणा केली आहे. भारतात ब्रिक्स देशांच्या बैठकीत सामील होण्यासाठी पुतीन भारतात येत आहेत. या वर्षी ब्रिक्स देशांची बैठकीचे यजमानपद भारत भूषवणार आहे. त्यामुळे ब्रिक्स देशांचे बडे नेते या बैठकीला उपस्थित रहाणार आहेत. ब्रिक्समध्ये ब्राझील, भारत, रशिया, चीन, साऊथ आफ्रीका, इराण आणि युएई सारख्या देशांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदींना प्रश्न! विदेशी गुप्तहेर असल्याची टीका, जगभरात चर्चेत आलेली ‘ही’ पत्रकार महिला कोण?

क्रेमलिनने पुतीन यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने स्वत:चा तयार केलेला नियम देखील तोडला आहे. वास्तविक, पुतिन यांच्या कोणत्याही परदेश दौऱ्याची घोषणा क्रेमलिनच्या वतीने प्रवासाच्या २ ते ४ दिवस आधी केली जाते. पुतीन यांच्या सुरक्षेसाठी असे केले जाते.मात्र, या वेळी पुतीन यांच्या दौऱ्याची घोषणा चार महिने आधीच केली आहे.

क्रेमलिनच्या मते राष्ट्राध्यक्ष पुतीन १२-१३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत राहतील, जेथे ते ब्रिक्सच्या बैठकीत भाग घेतील. ब्रिक्स संमेलनात पुतीन यांच्या सहभागावरुन रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अनेकदा वक्तव्य केली आहेत. आधी व्लादिमीर पुतिन गेल्यावर्षी २०२५ डिसेंबरमध्ये राजकीय दौऱ्यासाठी भारतात आले होते. २ दिवसीय दौऱ्या दरम्यान पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत चर्चा केली होती.

नशेचं इंजेक्शन अन् सामुहिक बलात्कार, NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीसोबत क्रूर कृत्य

पुतिन यांच्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर आता ब्रिक्सच्या बैठकीला चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पजेशकियन यांच्या संदर्भातही चर्चा सुरु आहे. हे दोन्ही नेते देखील या बैठकीसाठी भारतात येऊ शकतात. एवढेच नाही तर भारताच्या दौऱ्याची घोषणा अशा वेळी करण्यात आली आहे. जेव्हा ते ( पुतीन ) बिजींगच्या राजकीय दौऱ्यासाठी जाणार आहेत.

follow us