Video : टास्क ऑपरेशन सिंदूर, बाजूला ओवैसी अन् BJP महिला खासदार म्हणतीये ‘जाने तू या जाने ना’

या व्हिडिओत खासदार रेखा शर्मा गाणे गुणगुणताना दिसत आहेत. या प्रकारावरून देशात राजकारण सुरू झाले आहे.

Algeria Tour

Operation Sindoor : दहशतवादाचा पोशिंदा पाकिस्तानच्या दहशतवादी (India Pakistan Tension) कारवायांचा बुरखा फाडण्यासाठी भारताचे सर्वदलीय प्रतिनिधीमंडळ विदेश दौरे करत आहे. या दौऱ्यात विविध देशांना भेटी देऊन भारताची भूमिका मांडत आहे. तसेच पाकिस्तानच्या दुष्कृत्यांचा हिशोब देत आहे. विदेशातील या नेत्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Operation Sindoor) व्हायरल होत आहेत. पण यात असा एक व्हिडिओ आहे ज्याची तुफान चर्चा होत आहे. कारण हा व्हिडिओ अन्य व्हिडिओंच्या तुलनेत खूप वेगळा आहे. या व्हिडिओत खासदार रेखा शर्मा गाणे गुणगुणताना दिसत आहेत. या प्रकारावरून देशात राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून हा व्हिडिओ ट्विट केला आहे. यात त्या म्हणतात, मला वाटलं की सर्वदलीय प्रतिनिधीमंडळ भारतावर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात 28 लोक मृत्यूमुखी पडले. त्यानंतर भारतीय सैन्याचे ऑपरेशन सिंदूर, पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया आणि पूंछमध्ये आपल्या 16 निर्दोष लोकांच्या बलिदानाची माहिती जगाला देण्यासाठी गेले आहेत. पण येथे तर वेगळंच वातावरण आहे.

अरेच्चा.. भूकंपात मिळाली नामी संधी, कराचीत जेल तोडून 200 कैदी पळाले; कुख्यात अतिरेकीही पसार

व्हिडिओत नेमकं काय?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत राज्यसभा खासदार रेखा शर्मा आहेत. त्यांच्या आजूबाजूला प्रतिनिधीमंडळातील अन्य सदस्य उपस्थित आहेत. रेखा शर्मा यांच्या अगदी बाजूलाच एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी बसलेले आहेत. याच वेळी रेखा शर्मा जाने तू या जाने ना गाणे गात आहे. फक्त 15 सेकंदांच्या या व्हिडिओत ओवैसी सुद्धा हसताना दिसत आहेत. व्हिडिओच्या शेवटी लोक टाळ्या वाजवतानाही दिसत आहेत.

follow us